शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

दोनापावला येथील विक्रेत्यांच्या मागण्या सोमवारपर्यंत पूर्ण करा, अन्यथा...,  काँग्रेसचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 16:00 IST

शुक्रवारी दोनापावला येथील जेटीची काँग्रेसचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टोन डिकॉस्टा, आमदार कार्लूस फेरेरा तसेच इतर कार्यकर्त्यांसोबत पाहणी करुन स्थानिक विक्रेत्यांना पाठिंबा दिला.

- नारायण गावस

पणजी:  दोनापावला जेटीवर असलेल्या स्थानिक  विक्रत्यांचे योग्य पुर्नवसन करावे तसेच दोनापावला जेटीवर असलेली तपासणी गेट काढावी. त्याचप्रमाणे स्थानिक बसेसना आता येण्यास द्यावे. अशा या स्थानिक विक्रेत्यांच्या मागण्या सरकारने सोमवार पर्यंत मान्य केल्या नाहीतर काँग्रेस पक्ष दोनापावला जेटीवर आंदोलन करणार, असे गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले. शुक्रवारी दोनापावला येथील जेटीची काँग्रेसचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टोन डिकॉस्टा, आमदार कार्लूस फेरेरा तसेच इतर कार्यकर्त्यांसोबत पाहणी करुन स्थानिक विक्रेत्यांना पाठिंबा दिला.

हे भाजप सरकार स्थानिक गोमंतकीयांचा व्यावसाय नष्ट करु पाहत आहे. दोनापावला जेटीसाठी  ४ कोटी रुपये खर्च केले. पण अजूनही ही जेटी अपूर्ण आहे. या ठिकाणी दोनापावलाचे पुतळा बांधला नाही. तसेच कोरोना काळात या ठिकाणी असलेल्या स्थानिक विक्रेत्यांचे योग्य पुर्नवसन केले नाही. या सरकारला त्याचे काहीच पडलेले नाही असा अरोपही यावेळी अमित पाटकर यांनी केला.

ताबडतोब गेट काढादोनापावला पर्यटनस्थळी लावण्यात आलेली गेट ही सर्वंना अडणच भासत आहे. या गेटमुळे स्थानिक विक्रेत्यांना फटका बसत आहे. तसेच या ठिकाणी प्रती व्यक्ती ५० रुपये आकारले जात असल्याने पर्यटक आता जास्त येत नाही. तसेच स्थानिक बसेस आत येत नसल्याने याचा फटका स्थानिकांना बसत आहे. तसेच या विक्रेत्यांचे योग्य असे अजून पुर्नवसन करुन दिले नाही. मुख्यमंत्री तसेच पर्यटन  मंत्र्यांनी याची दखल घेऊन या स्थानिक विक्रेत्यांचा  प्रश्न सोडवावा,  असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.

स्थानिक विक्रेत्यांना न्याय द्यास्थानिक विक्रेते हे गेली अनेक वर्षापासून येथे व्यावसाय करत आहेत. आज पर्यटन येतात म्हणून  त्यांचा व्यावसाय चालत आहे. सरकारला त्यांना सरकारी नोकरी देता येत नाही निदान त्यांचा व्यवसाय तरी संकटात आणू नये, त्यांना यात प्रथम प्राधान्य द्यावे. तसेच त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकर पूर्ण कराव्या, असे आमदार कार्लोस फरेरा यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवा