शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात लाडली लक्ष्मीचे चार हजार अर्ज मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 23:21 IST

लाडली लक्ष्मी योजनेचा लाभ मिळावा म्हणून जे नवे चार हजार अर्ज सादर झाले होते, ते सरकारच्या महिला व बाल कल्याण खात्याने मंजूर केले आहेत.

पणजी : लाडली लक्ष्मी योजनेचा लाभ मिळावा म्हणून जे नवे चार हजार अर्ज सादर झाले होते, ते सरकारच्या महिला व बाल कल्याण खात्याने मंजूर केले आहेत. सरकार त्यासाठी आता निधी उपलब्ध करणार आहे. लाडली लक्ष्मी योजनेच्या लाभासाठी युवतींकडून मोठय़ा संख्येने अर्ज केले जातात. या योजनेखाली आयुष्यात एकदाच युवतींना एक लाख रुपयांचे अर्थसाह्य दिले जाते.बहुतांश युवतींना विवाहाच्यावेळी हे एक लाख रुपये मदतरुप ठरतात. गेल्या डिसेंबरमध्ये एकूण दीड हजार अर्ज महिला व बाल कल्याण खात्याने मंजुर केले. त्यांना अर्थसाह्यही मिळण्यास आरंभ झाला आहे. काहीजणांच्या बँक खात्यात अर्थसाह्य जमा झाले आहे. आता जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात मिळून आणखी चार हजार युवतींचे अर्ज लाडली लक्ष्मी योजनेंतर्गत मंजूर करण्यात आले आहेत. सरकारने या चार हजार लाभार्थीनाही निधी लवकर उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे.दरम्यान, महिला व बाल कल्याण खात्याकडून गृह आधार योजनाही राबविली जाते. या योजनेचे खरे लाभार्थी तेवढेच लाभार्थीच्या यादीत शिल्लक राहावेत म्हणून सरकारने सर्वेक्षण सुरू केले आहे. जीईएलकडून सव्रेक्षण केले जात आहे. लाभार्थीच्या घरोघर जाऊन हे सर्वेक्षण केले जाते. खात्याचे संचालक दीपक देसाई यांनी मंगळवारी लोकमतला सांगितले, की ज्या महिलांच्या कुटुंबांचे उत्पन्न आता वाढले आहे व ज्यांच्याकडून दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचाही लाभ घेतला जात आहे, त्यांना गृह आधार योजनेचा लाभ बंद केला जाईल. यामुळे अशा महिलांनी स्वत:हून गृह आधार योजनेचा लाभ बंद करावा म्हणून खात्याला लिहावे. त्यांनी स्वत:हूनच पुढे यावे.कारण दोन योजनांचा लाभ घेता येत नाही. वार्षिक तीन लाख रुपयांपर्यंत ज्यांचे उत्पन्न असते त्यांनाच गृह आधार योजनेचा लाभ मिळतो. आता अनेक कुटुंबांचे उत्पन्न वाढलेले असेल. अशा महिलांनी स्वत:हून गृह आधार योजनेच्या लाभाचा त्याग केल्यास ते खात्यासाठीही चांगले होईल. अन्यथा सर्वेक्षणावेळी खरे लाभार्थी कळून येईलच. जर महिलांनी स्वत:हून लाभ सोडला नाही तर, त्यांच्याकडून यापूर्वीचीही वसुली केली जाणार आहे.

टॅग्स :goaगोवा