शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

गोव्याचे चार मंत्री परदेश दौ-यावर, दोन मंत्री विदेशात घेणार उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 11:51 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील एकूण चार मंत्री सध्या विदेशात आहेत.

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातील एकूण चार मंत्री सध्या विदेशात आहेत. यापैकी मुख्यमंत्री पर्रीकर आणि ज्येष्ठ मंत्री फ्रान्सिस डिसोझा हे उपचारांसाठी गेले आहेत, तर दोघे मंत्री स्वत:च्या कामानिमित्त विदेशात आहेत. गोव्याचे वीज मंत्री पांडुरंग मडकईकर हे अजूनही मुंबईतील इस्पितळात उपचार घेत आहेत.मंत्री मडकईकर यांची प्रकृती थोडी सुधारली आहे. ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर गेले तीन महिने ते इस्पितळात आहेत. आता ते उठून बसतात व बोलतात, असे त्यांच्या संपर्कात असलेल्या काही व्यक्तींनी सांगितले. मात्र त्यांना इस्पितळातून कधी डिस्चार्ज दिला जाईल याविषयी काहीच माहिती उपलब्ध नाही. त्यांना उपचारांसाठी अजून इस्पितळात रहावे लागेल, असे काही जणांनी सांगितले.

मुख्यमंत्री पर्रीकर हे उपचारांसाठी दुस-यांदा अमेरिकेला गेले आहेत. ते येत्या 23 किंवा 24 रोजी गोव्यात परततील असे भाजपमधून सांगितले जात आहे. मुख्यमंत्री न्यूयॉर्कमधील स्लोन केटरिग स्मृती इस्पितळात उपचार घेत आहेत. तिथेच उपचार घेण्यासाठी गोव्याचे नगरविकास मंत्री डिसोझा हे रविवारी रात्री रवाना झाले आहेत. डिसोझा यांची प्रकृती खालावलेली आहे. त्यांना गेले वर्षभर विविध ठिकाणी उपचार घेणो भाग पडले आहे. मंत्री डिसोझा हे गेले काही दिवस म्हापसा येथील आपल्या निवासस्थानी होते. ते सचिवालयात जात नव्हते. जमेल तेवढे शासकीय काम ते घरातूनच करत होते. 

गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे हे आपल्या कामानिमित्त सध्या विदेशात आहेत. गेल्या 15 रोजी ते विदेश दौ-यावर गेले आहेत. कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी दोन दिवसांपूर्वीच आपल्या काही सहका-यांसोबत कॅनडा गाठले आहे. तेही काही दिवस विदेशात राहतील. गेले दोन-तीन आठवडे मंत्रिमंडळाच्या बैठका होऊ शकलेल्या नाहीत. मुख्य सचिव धमेंद्र शर्मा आणि मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील प्रधान सचिव कृष्णमूर्ती हे फोनवरून मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असतात, असे शासकीय सूत्रांनी सांगितले. 

सध्या पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, जलसंसाधन मंत्री विनोद पालयेकर, गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर व क्रीडा मंत्री बाबू आजगावकर हे गोव्यात आहेत.

टॅग्स :goaगोवा