शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

कोलवासह गोव्यातील चार प्रमुख खाड्या प्रदूषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 16:56 IST

कोलव्याच्या सुप्रसिद्ध खाडीसह गोव्यातील बहुतेक सर्व खाड्या प्रदूषित झाल्याची माहिती समोर आली आहे. या खाड्यांमध्ये सोडलेल्या सांडपाण्यामुळे हे प्रदूषण होत असल्याचा निष्कर्ष गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वार्षिक तपासणीतून पुढे आला आहे.

ठळक मुद्देकोलव्याच्या सुप्रसिद्ध खाडीसह गोव्यातील बहुतेक सर्व खाड्या प्रदूषित झाल्याची माहिती समोर आली आहे. खाड्यांमध्ये सोडलेल्या सांडपाण्यामुळे हे प्रदूषण होत असल्याचा निष्कर्ष गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वार्षिक तपासणीतून पुढे आला.कोलव्याबरोबरच पणजी येथील सांतइनेज खाडी त्याच बरोबर वेळसांव येथील दांडो मोळो ही खाडीही प्रदूषित झाली आहे.

मडगाव - कोलव्याच्या सुप्रसिद्ध खाडीसह गोव्यातील बहुतेक सर्व खाड्या प्रदूषित झाल्याची माहिती समोर आली आहे. या खाड्यांमध्ये सोडलेल्या सांडपाण्यामुळे हे प्रदूषण होत असल्याचा निष्कर्ष गोवाप्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वार्षिक तपासणीतून पुढे आला आहे. कोलव्याबरोबरच पणजी येथील सांतइनेज खाडी त्याच बरोबर वेळसांव येथील दांडो मोळो ही खाडीही प्रदूषित झाली आहे.

कोलवा, सांतइनेज आणि बेतोडा येथील खाडीच्या पाण्याचे नमुने दर महिन्याला तपासले जात असून 2015, 2017 व 2018 या वर्षाच्या चाचणीतून हे भीषण सत्य पुढे आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दाव्याप्रमाणे, सांतइनेजची खाडी मुख्यत: सांडपाण्यामुळे प्रदूषित झाली आहे. या खाडीची व्यवस्थित सफाई होत नसल्यामुळे ही समस्या अधिकच गंभीर झाली आहे. या प्रदुषणामुळे पाणी खराब तर झाले आहेच त्याशिवाय या खाडीतील जलचराचेही जीव धोक्यात आले आहे. या खाडीतील प्रदूषण पाहता तिच्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज मंडळाने व्यक्त केली आहे.

4 जून 2018 रोजी घेतलेल्या कोलवा खाडीतील पाण्याच्या नमुन्यातूनही मोठे प्रदूषण उघडकीस आले आहे. मंडळाच्या अहवालाप्रमाणे, या पाण्यातील बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड आणि एकूणच कॉलिफॉर्मचे प्रमाण विहित क्षमतेपेक्षा बरेच जास्त आहे. बेतोडय़ाच्या नाल्याच्या पाण्याची तपासणी 13 एप्रिल 2017 रोजी करण्यात आली होती. यातही बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड प्रमाणाबाहेर अधिक असल्याचे स्पष्ट झाले होते. दांडो मोळो या खाडीचीही अवस्था अशीच बिकट असल्याचे मंडळाने आपल्या अहवालात म्हटले आहे.दरम्यान, कोलवा खाडी साफ करण्यासाठी पाटबंधारे खात्याने लगेच काम हातात घेण्याचे ठरविले आहे. विधानसभा अधिवेशन संपल्यानंतर या कामाची निविदा जारी होऊ शकते अशी माहिती बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी दिली आहे. 

 

टॅग्स :goaगोवाpollutionप्रदूषण