पर्वरी : येथील मांडवी क्लिनिकजवळील इमारतीतील एका सदनिकेत वेश्या व्यवसाय चालल्याची कुणकुण लागताच पर्वरी पोलिसांनी शनिवारी छापा टाकून चार मुलीना रंगेहाथ ताब्यात घेतले. पोलिसानी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून वरील इमारतीत मुलींना आणून वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती खबर्याकडून मिळाली होती. कळंगुटचे पोलीस निरीक्षक नीलेश राणे यांनी सहकार्यांसमवेत सापळा रचून सायंकाळी ४.३० वाजता एका वाहनातून चार मुलींना त्या इमारतीतील सदनिकेत जाताच ताब्यात घेतले. राणे यांनी महिला हवालदार ब्रिंडा फर्नांडिस, वर्षा देसाई, अनिल पिळगावकर, विनोद नाईक आणि बिगर सरकारी संस्थेच्या सदस्यांसमवेत ही कारवाई केली. चार मुलींसह वाहनचालक जितेश हरीश दलवानी (मुंबई) यासही पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या दोन दिल्ली, एक पंजाब आणि एक उत्तर प्रदेश येथील मुली आहेत. ताब्यात घेतलेल्या चौघींचीही मेरशी येथील सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
वेश्या व्यवसायातील चार युवतींना पर्वरीत अटक
By admin | Updated: June 1, 2014 01:48 IST