शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या चार मंत्र्यांचा आज शपथविधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 19:59 IST

भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या दहा आमदारांनी गुरुवारी दिल्लीस जाऊन भाजपच्या सदस्यत्वाचे अर्जही भरले.

पणजी : भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या दहा आमदारांनी गुरुवारी दिल्लीस जाऊन भाजपच्या सदस्यत्वाचे अर्जही भरले. भाजपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा व राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचीही त्यांनी भेट घेतली. बाबू कवळेकर, मायकल लोबो, बाबूश मोन्सेरात व फिलीप नेरी रॉड्रीग्ज अशा चौघा भाजप आमदारांचा मंत्री म्हणून आज सायंकाळी शपथविधी होणार आहे.कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली दहा आमदार काँग्रेसमधून बुधवारी फुटले व त्यांनी काँग्रेस विधिमंडळ गटाचा दोन तृतीयांश भाग भाजपमध्ये विलीन केला. सरकारच्या विधिमंडळ खात्याने हे विलीनीकरण झाल्याचे जाहीर करणारी अधिसूचनाही गुरुवारी जारी केली. काँग्रेसमधील दहा आमदार एकदम पक्षातून बाहेर येण्याची ही दुसरी घटना आहे. कवळेकर हे उपमुख्यमंत्री असतील. गोवा फॉरवर्डच्या तिन्ही मंत्र्यांना आज शुक्रवारी मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाईल. त्या दृष्टीने मुख्यमंत्री सावंत आणि प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांची गुरुवारी दिल्लीत शहा यांच्याशी चर्चा झाली. दहा आमदार भेटण्यापूर्वी अगोदर सावंत व तेंडुलकर यांनी शहा यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. रोहन खंवटे यांनाही मंत्रिमंडळातून वगळले जाईल. दिल्लीला गेलेले सगळे नेते आज शुक्रवारी सकाळी गोव्यात परततील.दरम्यान, स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी टीकेचा सूर लावला आहे. दहा काँग्रेस आमदारांना भाजपमध्ये प्रवेश देणे उत्पलना रुचले नाही. पर्रीकर यांनी घालून दिलेल्या आदर्शापासून आताच्या भाजपाने फारकत घेतली आहे, अशी प्रतिक्रिया उत्पलने व्यक्त केली.