जम्मू/इस्लामाबाद : चिनाब नदीच्या जोरदार प्रवाहात वाहत जात थेट पाकिस्तानात पोहोचलेल्या भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला भारताच्या हवाली करून पाकिस्तानने दिलेला शब्द पाळला.
पाकिस्तानी रेंजर्सच्या कमांडर्स्नी जम्मूतील आरएसपुरा सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या जकात चौकीवर भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या अधिका:यांकडे सत्यशील यादवला सोपविले. त्याची तब्येत ठीक आहे. आंतरराष्ट्रीय सीमवरील 918 क्रमांकाच्या खांबाजवळ दुपारी सव्वाचार वाजता यादवला पाकिस्तानी रेंजर्सनी सहीसलामत आमच्या हवाली केले.