शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

RSSचे गोव्यातील माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांचा गोवा सुरक्षा मंचमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 13:53 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्यातील माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी गोवा सुरक्षा मंच पक्षात रितसर प्रवेश केला असून त्यांची पक्षप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.

पणजी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्यातील माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी गोवा सुरक्षा मंच पक्षात रितसर प्रवेश केला असून त्यांची पक्षप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. राज्यात विधानसभा विसर्जन अटळ असून लोकसभेबरोबरच विधानसभेच्याही मध्यावधी निवडणुका होतील, असे भाकित करताना वेलिंगकर यांनी 35 मतदारसंघांमध्ये पक्ष स्वबळावर उमेदवार उभे करील, असे जाहीर केले. ही निवडणूक गोसुमंसाठी सेमिफायनल असेल असे नमूद करताना एकदा निवडणूक जाहीर होऊ दे, या सरकारचे सर्व कारनामे उघड करीन, असा इशाराही त्यांनी दिला. माध्यम प्रश्नावर गेली सात वर्षे लढा देणारे वेलिंगकर यांनी पर्रीकर यांच्या नेतृत्त्वाखालील भाजपा सरकारशी असलेले संबंध तोडले व त्यानंतर संघाकडेही फारकत घेतली. गेल्या विधानसभा निवडणुकीत स्थापन झालेल्या गोवा सुरक्षा मंच पक्षाचे ते मार्गदर्शक होते परंतु राजकारणात सक्रीय नव्हते. आज त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचा अर्ज भरुन पक्षात प्रवेश केला. 

वेलिंगकर यांनी पर्रीकर सरकावर आगपाखड करताना प्राथमिक शिक्षणाबाबत माध्यम प्रश्नावर पर्रीकर यांनी जो विश्वासघात केला त्याबाबत कडाडून टीका केली. प्राथमिक शिक्षणाचे माध्यम मातृभाषेतूनच असावे आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे अनुदान रद्द करावे या मागणीवर पक्ष ठाम असल्याचे ते म्हणाले. 

‘सरकारचे सर्व कारनामे उघड करीन’

वेलिंगकर पुढे म्हणाले की, ‘आजारी असूनही मुख्यमंत्रीपद स्वत:कडेच रहावे या पर्रीकर यांच्या हट्टापायी राज्याचे मोठे नुकसान होत आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी मनमानी कारभार करीत आहेत. लोकांची कोणतीही कामे होत नाहीत. खाणबंदीचा प्रश्न हे सरकार सोडवू शकलेले नाही,  असे आरोप करताना वेलिंगकर पुढे म्हणाले की, गोव्यात भाजपच्या जडणघडणीत सुरवातीपासूनचा मी साक्षीदार आहे. त्यावेळी संघाचे २५0 कार्यकर्ते निवडणुकीच्या कामासाठी भाजपला दिले याची खंत आता वाटते. या सरकारने जनतेचे कोणतेही प्रश्न सोडवले नाहीत. पर्रीकर यांनी एकाधिकारशाही चालवली असून राज्य रुग्णशय्येवरुन चालवले जात आहे. अन्य मंत्री, आमदार नपुंसक  बनून या गोष्टी सहन करीत आहेत. एकदा निवडणूक जाहीर होऊ दे, या सरकारचे सर्व कारनामे उघड करीन.’

‘लोक कल्याणकारी सरकार हवे’

तत्त्वनिष्ठा आणि नैतिकता असलेले लोकहितकारी आणि लोक कल्याणकारी सरकार जनतेला देण्यासाठी राजकारणात यावे लागले. इतर राजकारण्यांप्रमाणे लोकांची मतें मिळविण्यासाठी देणग्या देणे किंवा त्यांना तीर्थयात्रांना पाठवणे या गोष्टी आम्हाला शक्य नाही. माझे कार्यकर्ते हीच माझी शिदोरी आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत पाच मतदारसंघांमध्ये मिळविलेली १0,५00 मतें हा खरे तर गोसुमंचा विजयच आहे. लोक आमच्याबरोबर आहेत हे यातून सिध्द होते, असे वेलिंगकर म्हणाले. 

गोसुमंचे अध्यक्ष आत्माराम गांवकर यांनी पुढील पाच वर्षात सरकार हे गोसुमंचेच असेल आणि वेलिंगकर मुख्यमंत्री बनतील, असा विश्वास व्यक्त केला. व्यासपीठावर भारतीय भाषा सुरक्षा मंचचे उदय भेंब्रे, अरविंद भाटीकर, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली, गोसुमंचे ज्येष्ठ उपाध्यक्ष किरण नायक, महिला अध्यक्षा रोशन सामंत, भारत माता की जय या संघटनेचे अवधूत कामत, अ‍ॅड. स्वाती केरकर, डॉ. प्रकाश कुराडे, युवा अध्यक्ष नीतीन फळदेसाई, नंदन सावंत, संदीप पाळणी, विनायक पाळणी आदी उपस्थित होते. 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघgoaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर