शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

माजी मंत्री सुरेश आमोणकर यांचे कोविडमुळे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 21:18 IST

आमोणकर हे पाळी (आताचा साखळी) मतदारसंघाचे आमदार म्हणून 1999 व 2002 अशा दोन निवडणुकांवेळी निवडून आले. आमोणकर अगोदर फ्रान्सिस सार्दिन यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये मंत्री झाले होते.

पणजी : राज्याचे माजी आरोग्य मंत्री व गोवा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. सुरेश आमोणकर यांचे सोमवारी रात्री मडगावच्या कोविड इस्पितळात निधन झाले. आमोणकर हे मूत्रपिंड विकाराने त्रस्त होते पण त्यांना कोविडची लागण झाल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला. कोविडमुळे मरण पावणा:या रुग्णांची एकूण संख्या मंगळवारी गोव्यात आठ झाली. आमोणकर हे मृत्यूसमयी 58 वर्षे वयाचे होते.

आमोणकर हे पाळी (आताचा साखळी) मतदारसंघाचे आमदार म्हणून 1999 व 2002 अशा दोन निवडणुकांवेळी निवडून आले. आमोणकर अगोदर फ्रान्सिस सार्दिन यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये मंत्री झाले होते. मग ते पर्रीकर मंत्रिमंडळात मंत्री होते. आरोग्य खाते ते सांभाळत होते. एक मितभाषी, शांत व सौम्य स्वभावाचे डॉक्टर व मंत्री असा त्यांचा गोव्याला परिचय होता. त्यांच्या निधनाचे दु:ख कळताच साखळीतील लोकांनाही खूप दु:ख झाले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही दु:ख व्यक्त केले. आमोणकर यांचे निधन झाल्याची घोषणा आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांनी केली.

आमोणकर यांना 2007 सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार स्व. गुरुदास गावस यांनी प्रथम पराभूत केले. त्यानंतर गावस यांचे 2008 च्या आसपास निधन झाले व साखळीत विधानसभेची पोटनिवडणूक झाली. त्या पोटनिवडणुकीत आमोणकर यांना भाजपने उमेदवारी नाकारली. स्व. मनोहर र्पीकर यांच्याशी आमोणकर यांचे मतभेद झाले होते. आमोणकर यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी बंड केले व अपक्ष निवडणूक लढवली. त्या पोटनिवडणुकीत भाजपच्या मतांचे विभाजन झाले व प्रमोद सावंत आणि आमोणकर असे दोघेही पराभूत झाले. काँग्रेसतर्फे प्रताप गावस त्यावेळी जिंकले. आमोणकर पुन्हा कधीच विधानसभा निवडणूक जिंकले नाही. 2012 ची निवडणूक प्रमोद सावंत जिंकले. आमोणकर व भाजप यांच्यात आलेली कटुता कायम राहिली. अलिकडे ते राजकारण पूर्णपणो सोडून आपला वैद्यकीय व्यवसायच करत होते. भाजपचे काही माजी नेते तसेच काही माजी मंत्री कायम आमोणकर यांच्याशी संपर्क ठेवून होते.

आमोणकर यांची मूत्रपिंडे निकामी झाली होती. ते डायलसिसवर होते. ते ज्या खासगी इस्पितळात उपचारांसाठी जात होते, त्याच इस्पितळात त्यांना कोविडची लागण झाली असावी असे डॉक्टरांचे म्हणणो आहे. आमोणकर हे मूळचे डिचोली तालुक्यातील आमोणा गावचे. तथापि, ते साखळीतच स्थायिक झाले. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले आहेत.

कुंकळ्ळीचे आमदारही गंभीर ?दरम्यान, कुंकळ्ळीचे आमदार क्लाफास डायस यांनाही यापूर्वीच कोविडची लागण झालेली आहे. डायस हे देखील इस्पितळात उपचार घेत आहेत. डायस यांची प्रकृती गंभीर असल्याची चर्चा भाजपमध्ये सुरू आहे. डायस यांच्या कुटूंबाच्या दोघा सदस्यांनाही कोविडची लागण झालेली आहे. माजी मंत्री जुङो फिलिप डिसोझा यांचे बंधूचे शनिवारच्या मध्यरात्री निधन झाले. तो कोविडमुळे झालेला सातवा मृत्यू होता. आमोणकर यांच्या रुपात आठव्या मृत्यूची नोंद झाल्याने गोव्याला धक्का बसला आहे.

 आमोणकर यांच्या निधनाने तीव्र दु:ख झाले. ते भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष होते. तसेच माजी मंत्रीही होते. त्यांनी गोव्यासाठी दिलेले योगदान कधीच विसरता येणार नाही.- मुख्यमंत्री प्रमोद सावंत

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या