शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, लुईस बर्जर कथित लाचखोरी प्रकरणी अटकपूर्व जामीन कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 16:51 IST

2015 साली ज्या कथित लुईस बर्जर लाचखोरी प्रकरणाने संपूर्ण गोवा राज्य ढवळून काढले होते. त्या प्रकरणात गोव्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार दिगंबर कामत यांना सत्र न्यायालयाने मंजूर केलेला अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवला.

 मडगाव (गोवा) - 2015 साली ज्या कथित लुईस बर्जर लाचखोरी प्रकरणाने संपूर्ण गोवा राज्य ढवळून काढले होते. त्या प्रकरणात गोव्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार दिगंबर कामत यांना सत्र न्यायालयाने मंजूर केलेला अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवल्याने कामत यांनी सुटकेचा निश्वास सोडला.सोमवारी दुपारी या अटकपूर्व जामिनाच्या विरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली स्पेशल लीव्ह पिटीशन आव्हान याचिका न्या. चलमेश्र्वर व न्या. नझीर या व्दिसदस्यीय पिठाकडून फेटाळण्यात आली. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयानेही राज्य सरकारची आव्हान याचिका फेटाळली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.दिगंबर कामत हे गोव्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी व त्यांचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहकारी मंत्री चर्चिल आलेमाव यांनी गोव्यात जलवाहिनी बसविण्याच्या कामासाठी लुईस बर्जर या अमेरिकन कंपनीकडून एक दशलक्ष डॉलर्सची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात तत्कालीन मंत्री चर्चिल आलेमाव यांना अटकही करण्यात आली होती. मात्र कामत यांनी सत्र न्यायालयात आपल्याला अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी धाव घेतली होती. या प्रकरणात 18 ऑगस्ट 2015 रोजी उत्तर गोव्याचे प्रधान सत्र न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांनी एक लाखाच्या हमीवर कामत यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. कामत यांना नेमके कुठल्या कारणासाठी अटक करायची आहे याची नोंद पोलीस डायरीत केली नसल्याचे कारण पुढे करुन हा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला होता. या आदेशाला राज्य सरकारने नंतर उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पण उच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा आदेश कायम ठेवला होता.यासंदर्भात कामत यांची प्रतिक्रिया विचारली असता, माझा न्यायव्यवस्थेवर व देवावर पूर्ण विश्र्वास होता. मला या प्रकरणात न्याय मिळेल याची पूर्ण खात्री होती. या निकालाने मला दिलासा मिळाला आहे. शेवटी सत्याचाच विजय होतो यावर माझा पूर्ण विश्र्वास आहे असे ते म्हणाले. या प्रकरणात तपास करणा-या क्राईम ब्रँचने यापूर्वीच कामत व आलेमाव यांच्यासह एकूण सहा जणांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक विरोधी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. 

टॅग्स :goaगोवा