शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Formalin In Fish : गोव्यात मासळी आयातीवर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 14:26 IST

गोवा सरकारने पुढील पंधरा दिवसांसाठी इतर राज्यांमधून होणाऱ्या मासळी आयातीवर बंदी घातली आहे.

पणजी :  गोवा सरकारने पुढील पंधरा दिवसांसाठी इतर राज्यांमधून होणाऱ्या मासळी आयातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे पुढील 15 दिवस गोव्यातील खवय्ये तसेच येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना मासळीपासून वंचित राहावे लागणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ तसेच अन्य मासळी राज्यांमधून आयात केलेल्या मासळीत फॉर्मेलिन हे घातक रसायन आढळल्यानं गेले काही दिवस राज्यात खळबळ उडाली आहे.

अन्न व औषध प्रशासनाने गेल्या आठवड्यात आंध्र प्रदेशचे 17 ट्रक जप्त करून मासळी ताब्यात घेतली आणि चाचणी केली असता काही प्रमाणात फॉर्मेलिन सापडले होते. परंतु व औषध प्रशासनाने त्याच दिवशी सायंकाळी आपला अहवाल बदलून फॉर्मेलिन मर्यादित स्वरूपात असल्याचे जाहीर केले होते. परंतु गोव्यातील लोकांनी मासळी खरेदीची एवढी धास्ती घेतली होती की गेले आठ दिवस मासे बाजार ओस पडले होते. 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज आयात बंदीचा निर्णय जाहीर करताना फळे तसेच आयात होणाऱ्या भाज्या प्रशासनाच्या स्कॅनरखाली असतील, कृत्रिमरित्या पिकविलेली फळे तसेच भाज्या  घेऊन येणारे ट्रक तपासले जातील, असेही सांगितले. आंध्र प्रदेश, केरळ व अन्य राज्यांमधून रोज सुमारे 200 टन मासळी गोव्याच्या बाजारपेठेत येते. गोव्यात सध्या पावसाळ्यात मासेमारी बंदी असून 1 ऑगस्टला ती उठणार आहे. त्यानंतर गोव्याचे ट्रॉलर्स समुद्रात जाऊन मासेमारी करू शकतात त्यामुळे स्थानिक मासे उपलब्ध होणार असून आयातीवर अवलंबून राहावे लागणार नाही असे पर्रीकर म्हणाले.

 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवाfishermanमच्छीमार