शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील एनजीओंना विदेशी निधी, भाजपचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 19:27 IST

पणजी : गोव्यातील काही एनजीओंना विदेशातून निधी मिळत आहे.

पणजी : गोव्यातील काही एनजीओंना विदेशातून निधी मिळत आहे. त्या एनजीओ गोव्यात आणि विशेषत: सासष्टीत कोणताच प्रकल्प येऊ देत नाहीत, असा आरोप भाजपचे माजी आमदार सुभाष फळदेसाई व प्रवक्ते प्रेमानंद म्हांब्रे यांनी येथे घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केला.फळदेसाई म्हणाले, की कोळसा हाताळणी, नद्यांचे राष्ट्रीयीकरण, शैक्षणिक वसाहत तसेच आयआयटी वगैरे सर्वच प्रकल्पांना काही एनजीओ विरोध करतात. सासष्टीमध्ये तर काहीजणांना कोणताच प्रकल्प नको. सांगेतील लोकांनी साळावली धरण प्रकल्पासाठी त्याग केला व त्यामुळे सासष्टी, केपे, मुरगाव अशा तालुक्यांना पिण्याचे पाणी मिळते. सांगे तालुक्यातील अनेक पंचायतींना मात्र अजून पाण्याचा पुरवठाच होत नाही. आम्ही या कामाचा सरकारकडे पाठपुरावा करत आहोत.फळदेसाई म्हणाले, की साळावली धरणाशीसंबंधित पुनर्वसनग्रस्तांना नळाद्वारे अजून पाण्याचा थेंब देखील मिळत नाही. त्यामुळेच आयआयटीसारख्या प्रकल्पाला सांगेतील लोकही विरोध करतात. आयआयटीसाठी आम्ही का म्हणून त्याग करावा असा प्रश्न सांगेतील लोक करत आहेत. अगोदर आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवा, मग आयआयटी आणा, असे सांगेतील लोक म्हणतात. आपण आयआयटी प्रकल्पाचे स्वागत करतो, कारण देशाच्या शैक्षणिक नकाशावर त्यामुळे गोव्याचे नाव होईल. मात्र त्याचबरोबर सरकारने सांगेवासीयांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा. सांगेत शेती व जलसिंचनासाठी देखील पाणी मिळत नाही.फळदेसाई म्हणाले, की सांगेतील लोकांनी त्याग केला म्हणून साळावली धरण साकारले व त्याद्वारे सासष्टीला पाणी मिळते. जोपर्यंत सांगे तालुक्यातील प्रत्येक पंचायत क्षेत्रात पिण्याचे पाणी पोहोचत नाही, तोपर्यंत सरकारने साळावलीमधून सासष्टी व अन्य तालुक्यांना पाणी सोडू नये, अशी मागणी सांगेतील युवक करत आहेत.येत्या दोन महिन्यांत सरकारने सांगेतील पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सोडवावा, अन्यथा साळावलीतून अन्य तालुक्यांना पाणी सोडू नये. सासष्टीतील ट्रकवाल्यांची दादागिरीही आम्ही खपवून घेणार नाही. फळदेसाई म्हणाले, की गोव्यातील काही लोकांना वीज हवी पण कोळसा नको. हातात तीन मोबाईल फोन हवे पण मोबाईल टॉवर नको. राहण्यासाठी घर हवे पण गृहनिर्माण वसाहत नको. विकास प्रकल्पांच्या मार्गामध्ये काही एनजीओ अडथळाच आणण्याचे काम करत आहेत.

टॅग्स :goaगोवा