शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

फोर्मालीन प्रकरणात कॉंग्रेसची न्यायालयात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 21:39 IST

न्यायालयीन चौकशीची मागणी 

पणजी: फोर्मालीनयुक्त मासळीच्या प्रकरणात कॉंग्रेसचे पणजीतील नेते विनायक कामत तारकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात धाव घेतली आहे. गोव्याबाहेरून येणाºया मासळीवर कायम बंदी घालण्याची आणि फोर्मालीनच्या चाचणी अहवालात फेरफार करण्यासाठी जबाबदार असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाºयांची चौकशी करावी अशी मागणी जनहीत  याचिकेत करण्यात आली आहे. 

फोर्मालीन प्रकणात सरकारविरुद्ध  एकाचवेळी तीन आघाड्यांवर टक्कर देण्याची खेळी कॉंग्रेसकडून खेळण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या मुख्यालयाला घेराव घालणे, विधानसभेचे कामकाज रोखून धरणे या पाठोपाठ आता न्यायालयीन लढाही कॉंग्रेसने छेडला आहे. कामत यांनी या प्रकरणात खंडपीठात धाव घेऊन प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. घाऊक मासळी बाजारात करण्यात आलेली एफडीएच्या चाचणीतही अहवाल फोर्मालीनसाठी पॉझिटीव्ह आला आणि एफडीएच्या प्रयोगशाळेतही केलेल्या चाचणीत फोर्मालीनचे अंश सापडल्याचे दोन्ही अहवाल सांगतात. ह्या गंभीर विषयामुळे लोकात भितीचे वातावरण असल्याचे त्यांनी म्हटलेआहे.

मासळीबाजारात तसेच फळे व भाज्यांच्या बाजारातही एफडीएचे काउन्टर असावेत. या काउन्टरवर मासळी, फळे, भाज्या यांच्या चाचणीची व्यवस्था व्हावी. खुल्या मासळी बाजारात मासळी पोहोचण्यापूर्वीच चाचण्या घेण्यात याव्यात. तसेच गोव्यात मासळीचा होणारा तूटवढा संपविण्यासाठी मासळीच्या निर्यातीवर बंदी घालावी. त्यापूर्वीही मासळी गोव्यात टीकावू पद्धतीने साठवून ठेवण्यासाठी व्यवस्था उभारण्यात यावी असे म्हटले आहे. गोव राज्याचे मुख्य सचीव, अन्न व औषध प्रशासन आणि मच्छीमार खात्याला या प्रकरणात प्रतिवादी करण्यात आले आहे. हे प्रकरण मंगळवारी किंवा बुधवारी सुनावणीला येण्याची शक्यता आहे.