शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

२०२४ साठी गोमंतकीयांनो सावधान! नाताळ उत्सवांवर निर्बंध घालण्याचे मध्य प्रदेश सरकारचे परिपत्रक; गोव्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचा इशारा

By सूरज.नाईकपवार | Updated: December 25, 2023 11:52 IST

शालेय मुलांसाठी कोणत्याही नाताळ उत्सवात भाग घेणे, ख्रिसमस ट्री सजवणे, सांताक्लॉजसारखे कपडे घालणे यासाठी सरकारची पूर्व परवानगी घेण्याचे बंधनकारक करणे आणि उल्लंघन झाल्यास कारवाईस सामोरे जाण्याचा इशारा मध्यप्रदेश सरकारच्या या परिपत्रकात देण्यात आला आहे.

लोकमत न्युजनेटवर्क

मडगाव :मध्य प्रदेश भाजप सरकारच्या नाताळ सणावर निर्बंध जारी करणाऱ्या परिपत्रकाचा  गोव्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी तीव्र निषेध केला आहे. यातून बोध घेत साठी पुढच्या वर्षी गोमंतकीयांनी सावध राहणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.

शालेय मुलांसाठी कोणत्याही नाताळ उत्सवात भाग घेणे, ख्रिसमस ट्री सजवणे, सांताक्लॉजसारखे कपडे घालणे यासाठी सरकारची पूर्व परवानगी घेण्याचे बंधनकारक करणे आणि उल्लंघन झाल्यास कारवाईस सामोरे जाण्याचा इशारा मध्यप्रदेश सरकारच्या या परिपत्रकात देण्यात आला आहे. शाळांमध्ये ख्रिसमस साजरे करण्यावर निर्बंध लादणाऱ्या मध्य प्रदेशातील भाजप सरकारच्या जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या परिपत्रकाचा संदर्भ देत विरोधी पक्षनेत्यांनी भाजप सरकार हुकूमशाही कारभार चालवीत असल्याचा गंभीर आरोप केला.

सर्व मुलांना सर्व भारतीय सण मुक्तपणे साजरे करू द्या. प्रत्येक सण आणि संस्कृतीचा आदर करणारा सर्वसमावेशक समाज असणे गरजेचे आहे. सण आणि परंपरांना राजकीय अजेंडांपासून दूर ठेवणे महत्वाचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.गोमंतकीयांनी या हुकूमशाही परिपत्रकाकडे अत्यंत सावधगिरीने पहावे. नजीकच्या भविष्यात आपल्यासाठी हेच वाढून ठेवले आहे. हा विषाणू लवकरच संपूर्ण देशात पसरेल. हे थांबवायचे असेल तर २०२४मध्ये एकजुटीने उभे राहण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

मध्य प्रदेश भाजप सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात आश्चर्यकारक काहीही नाही. गोव्यातील भाजप सरकारही त्याच दिशेने वाटचाल करत आहे. त्यांनी आधीच गोव्यातील लग्न आणि कौटुंबिक कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे, असे युरी आलेमाव यांनी नमूद केले.२०२४ मध्ये आपल्या सर्वांना एक संधी येत आहे. आपण सर्वजण आपल्या लोकशाही आणि मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध राहू या. आपण सर्वांनी फुटीरतावादी शक्तींचा पराभव करण्याची शपथ घेऊ या. हुकूमशाही राजवटीला पराभूत करण्यासाठी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे, असे युरी आलेमाव यांनी गोमंतकीयांना आवाहन केले आहे.

टॅग्स :Christmasनाताळ