शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर गोव्याला पुराचा मोठा फटका, शेतीची हानी, 45 कुटुंबांचे स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 18:31 IST

तिळारी धरणासह अन्य ठिकाणचेही पाणी सोडावे लागल्याने उत्तर गोव्यातील तीन तालुक्यांना जास्त फटका बसला.

पणजी - तिळारी धरणासह अन्य ठिकाणचेही पाणी सोडावे लागल्याने उत्तर गोव्यातील तीन तालुक्यांना जास्त फटका बसला. बार्देश, डिचोली व पेडणो तालुक्यातील एकूण 45 कुटूंबांचे तातडीने अन्यत्र स्थलांतर करावे लागले. पाण्याची पातळी सायंकाळीही कमी झालेली नाही. उत्तर गोव्यात शेतीची मोठी हानी झाली आहे.बार्देशचे जुवे बेट, पेडणोतील बैलापूर तसेच डिचोलीतील साळ वगैरे भागातील लोकांच्या घरांमध्ये पाणी  घुसले. लोकांचे खूप हाल झाले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अशा घरांना गुरुवारी सकाळी भेट दिली. त्यानंतर त्यांनी पर्वरी येथील विधानसभा प्रकल्पाबाहेर पत्रकारांना माहिती दिली. आपण रात्री दीड-दोन वाजेर्पयत विविध शासकीय यंत्रणांच्या संपर्कात होतो. काही आमदारांच्याही संपर्कात होतो. स्थितीवर सरकारचे लक्ष आहे. मदतकार्य सुरू झाले आहे. तीन तालुक्यांमध्ये शेतीचीही मोठी हानी झाली आहे पण मनुष्यहानी झाली नाही. सरकारी यंत्रणांनी तीन तालुक्यांमधील 4क् ते 45 कुटुबांचे अन्यत्र स्थलांतर केले. त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्थाही करून घेण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. सिंधुदुर्गमध्ये  खूप पाऊस पडत असल्याने तिळारी धरणातील पाणी तेथील यंत्रणांनी सोडले.त्यांच्यासमोरही अन्य पर्याय नव्हता, असे मुख्यमंत्री  म्हणाले. सर्वाधिक फटका राणोंच्या जुवे बेटावरील लोकांना बसला. तिथे पंचवीस घरे असून त्या सर्व घरांमध्ये पाणी गेले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, तिसवाडी तालुक्यातील करंजाळे एक इसम त्याच्या वाहनासह जांबोटी येथे प्रवास करताना वाहून गेल्याची माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. 

टॅग्स :goaगोवाfloodपूर