शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
4
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
5
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
6
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
9
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
10
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
11
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
12
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
13
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
14
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
18
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
19
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
20
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो

तुरुंग अधीक्षकांसह पाचजण निलंबित

By admin | Updated: October 14, 2015 01:26 IST

म्हापसा/पणजी : कोलवाळ तुरुंगात सोमवार, दि. १२ रोजी कैद्यांना झालेल्या मारहाणप्रकरणी तुरुंगाचे अधीक्षक मेल्विन वाझ यांच्यासह चार तुरुंग रक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.

म्हापसा/पणजी : कोलवाळ तुरुंगात सोमवार, दि. १२ रोजी कैद्यांना झालेल्या मारहाणप्रकरणी तुरुंगाचे अधीक्षक मेल्विन वाझ यांच्यासह चार तुरुंग रक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. वाझ यांच्याच सांगण्यावरून कैद्यांना मारहाण झाल्याचे निष्पन्न झाल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी ‘लोकमत’ला रात्री सांगितले. वाझ यांची आधी बदली करण्यात आल्याचा आदेश काढला होता. मात्र, बुधवारी सकाळी त्यांच्या निलंबनाचा आदेश निघेल. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी आयएएस अधिकारी सचिन शिंदे यांची एक सदस्यीय समिती नेमल्याचे मुख्यमंत्री पार्सेकर यांनी सांगितले. तुरुंग महानिरीक्षक एल्विस गोम्स यांनी मंगळवारी दि. १३ रोजी तुरुंगात जाऊन घटनेची चौकशी केली आणि तुरुंग रक्षकांकडून चूक झाल्याचे प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाल्याने ही निलंबनाची कारवाई करण्यात आली. या प्रकरणी आणखी काही जणांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता गोम्स यांनी व्यक्त केली आहे. लक्ष्मण पाडलोसकर, केशव गावस, राकेश भानस्कर, विलास नाईक अशी निलंबित केलेल्या तुरुंग रक्षकांची नावे आहेत. काही कैद्यांनी मारहाण झाल्याबाबत म्हापशातील अमली पदार्थविषयक प्रकरणे हाताळणाऱ्या विशेष न्यायालयाच्या (एनडीपीएस) न्यायाधीशांकडे तक्रार केल्याने हे प्रकरण उजेडात आले होते. काही कैद्यांनी कारागृहात जाण्यास नकार दिल्याने सुरक्षा रक्षकांकडून मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. याबाबत कैद्यांची वैद्यकीय तपासणी केली असता, त्यांना जबर मारहाण झाल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणी कारागृहातील सहा कैद्यांनी म्हापसा पोलीस स्थानकात तक्रार केली आहे. दरम्यान, सुमारे ५० कैद्यांनी संबंधित सुरक्षा रक्षकांवर कारवाईची मागणी करीत मंगळवारी जेवण घेण्यास नकार देऊन उपोषण सुरू केले होते. दरम्यान, मानव अधिकार आयोगाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी कारागृहाला भेट दिली. या वेळी तेथे असलेल्या कैद्यांचा जबाब नोंद करून घेतला. उपलब्ध माहितीप्रमाणे इटलीच्या कैद्याच्या हाताला व नायजेरियनच्या पायाला दुखापत झाली आहे. कारागृहातील काही कैद्यांचे वकील पोवळेकर यांनीही मंगळवारी कारागृहाला भेट दिली. कारागृहाचे महानिरीक्षक एल्विस गोम्स यांनी कारागृहाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, सार्वजनिक गाऱ्हाणी खात्याच्या संचालिका मार्गारेट फर्नांडिस यांना कोलवाळ कारागृह अधीक्षकपदी नेमले आहे. (खास प्रतिनिधी)