शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

पाच कॅसिनोंना मांडवीतून हटविणार

By admin | Updated: March 28, 2017 03:05 IST

पणजी : मांडवी नदीतील पाचही कॅसिनो जहाजे अन्यत्र हटवावीत यावर पर्रीकर मंत्रिमंडळाचे सोमवारी एकमत झाले. तूर्त मांडवीत राहण्यासाठी

पणजी : मांडवी नदीतील पाचही कॅसिनो जहाजे अन्यत्र हटवावीत यावर पर्रीकर मंत्रिमंडळाचे सोमवारी एकमत झाले. तूर्त मांडवीत राहण्यासाठी प्रथम तीन महिन्यांची मुदतवाढ या कॅसिनोंना द्यावी असे ठरले. गोल्डन ग्लोब कंपनीचा सहावा तरंगता कॅसिनो गोव्यात नको, अशी भूमिका मंत्री विजय सरदेसाई व रोहन खंवटे यांनी जोरदारपणे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासमोर मांडली. मुख्यमंत्र्यांनाही ती तत्त्वत: पटली.पर्रीकर मंत्रिमंडळाची दुसरी बैठक सोमवारी सकाळी मंत्रालयात पार पडली. फक्त मांडवीतील तरंगत्या कॅसिनोंचाच एकमेव विषय मंत्रिमंडळासमोर होता. येत्या ३१ रोजी मांडवीतील या कॅसिनोंची मुदत संपते. त्यामुळे सोमवारी बैठक घेतली गेली. गेली पाच वर्षे मांडवीतून कॅसिनो हटविण्याच्या घोषणा होत आहेत; पण कृती मात्र होत नव्हती.मंत्रिमंडळाच्या बैठकीवेळी या कॅसिनोंबाबत व राज्यातील लोकभावनेबाबत गंभीरपणे चर्चा झाली. येत्या तीन महिन्यांनंतर हे कॅसिनो हटविण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांना दिला. कॅसिनोंसाठी योग्य अशी पर्यायी जागा अगोदर पाहूया आणि मग त्यांना मांडवीबाहेर जाण्यासाठी तीन महिन्यांनंतर धोरण ठरवूया, असे मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना सांगितले. पाचपैकी चार कॅसिनोंच्या परवान्यांची मुदत २०१८ साली संपुष्टात येत आहे. तर डेल्टा प्लेझर क्रुझ कंपनीच्या एम. व्ही. रॉयल फ्लॉटेल या कॅसिनोची मुदत २०१९ मध्ये संपुष्टात येत आहे.