शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मिरामार सौंदर्यीकरणाच्या कामाचा पहिला टप्पा पूर्ण; नोव्हेंबरपर्यंत सर्व काम पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 14:13 IST

आमदार बाबुश मोन्सेरात, महापौरांकडून पाहणी 

पणजी : मिरामार सौंदर्यीकरणाच्या कामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून स्थानिक आमदार बाबुश मोन्सेरात, महापौर उदय मडकईकर तसेच ‘स्मार्ट सिटी’च्या अधिकाºयांनी या कामाची काल संयुक्त पाहणी केली. 

सौंदर्यीकरणाच्या या कामाचे उर्वरित तीन टप्पे नोव्हेंबरअखेरपर्यंत पूर्ण होतील, असे सांगण्यात आले. इमेजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलॉपमेट लि,चे व्यवस्थापकीय संचालक स्वयंदिप्ता पाल चौधरी तसेच अन्य अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. एकूण १२ कोटी ८७ लाख,४८ हजार ५८७ रुपये खर्च या एकूण प्रकल्पासाठी येणार आहे. 

सौंदर्यीकरणाच्या पहिल्या टप्प्यात किनाºयावर व्यायामासाठी खुले जिम्नेशियम, हवेशीर बसण्यासाठी बाकड्यांची सोय केली आहे. दुसºया टप्प्यात ‘फूड कोर्ट’ येणार असून किनाºयावर बसून अन्नपदार्थांचा आस्वाद घेण्याची सोय होईल. किनाºयाच्या प्रवेशव्दाराचा कायापालट केला जाईल.  महापौर म्हणाले की, याआधीच्या सौंदर्यीकरण आराखड्यात काही त्रुटी होत्या त्यात आमदार मोन्सेरात यांनी बदल केले आहेत. नोव्हेंबरअखेरपर्यंत सर्व काम पूर्ण केले जाईल.                                

सायकल रॅली पुढे ढकला  - महापालिकेचे पत्र दरम्यान, इमेजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलॉपमेट लि, तर्फे येत्या १३ रोजी आयोजित सायकल रॅली कोविडच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलावी, असे आवाहन महापालिकेने आयपीएससीडीएल्ला पत्र लिहून केले आहे.  रायबंदर ते दोनापॉल असे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महापौर उदय मडकईकर यांनी आयपीएसडीएल्ला लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, ‘शहरात कोविडबाधितांचे प्रमाण वाढल्याने येत्या १३ ऐवजी २ आॅक्टोबरपासून गांधी जयंतीदिनापासून ही रॅली सुरु करावी आणि त्यानंतर ठरल्यानुसार दर रविवारी घ्यावी.

टॅग्स :tourismपर्यटनgoaगोवा