शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
2
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
3
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
4
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
5
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
6
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
7
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?
8
"झारखंडमध्ये करण्यात आली रविवारऐवजी शुक्रवारची सुट्टी'; लव्ह जिहादवर भाष्य करत PM मोदी जोरदार बरसले
9
उद्धव ठाकरे, संजय राऊत परदेशात; १ जूनच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी मारणार?
10
रियान परागने सारा-अनन्याचे हॉट फोटो सर्च केले; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
11
"मी पण कलेक्टर बनणार"; टीव्हीवर सूर्यवंशम सिनेमा पाहून UPSC परीक्षा दिली अन्...
12
तरुणी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
13
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
14
मुंबई कोस्टल रोडवर श्रद्धा कपूरने चालवली Lamborghini; म्हणाली, 'लेट नाईट ड्राईव्ह...'
15
सेन्सेक्स-निफ्टीनं तेजी गमावली; डिव्हिस लॅब्सचे शेअर वाढले, अदानी समूहाचे सर्व शेअर पडले
16
२२व्या वर्षी अवनीत कौर झाली Engaged? बोटातील रिंग दाखवत म्हणाली- "चांगल्या गोष्टी..."
17
"अल्पवयीन आरोपीसोबत आमदाराचाही मुलगा होता"; पुणे प्रकरणात नाना पटोलेंचा गंभीर आरोप
18
'रुखी सुटी रोटी..' गाण्यावर भगरे गुरुजींच्या लेकीचा इलेक्ट्रिफायिंग डान्स, व्हिडीओ बघाच
19
३१ मे पर्यंत पूर्ण करा Aadhaar-PAN शी निगडीत 'हे' काम, अन्यथा भरावे लागतील दुप्पट पैसे
20
१० दिग्गजांनी जाहीर केले वर्ल्ड कपचे सेमीफायनलिस्ट; टीम इंडियावर सर्वांनी दाखवला विश्वास

गोव्याच्या पर्यटक हंगामातील पहिले विदेशी क्रुझ जहाज १५८७ विदेशी पर्यटकांना घेऊन मुरगाव बंदरात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2019 7:04 PM

पर्यटक हंगामातील पहिले विदेशी क्रुझ जहाज रविवारी  १५८७ विदेशी पर्यटकांना घेऊन गोव्याच्या मुरगाव बंदरात दाखल झाले

वास्को: ह्या वर्षाच्या पर्यटक हंगामातील पहिले विदेशी क्रुझ जहाज रविवारी  १५८७ विदेशी पर्यटकांना घेऊन गोव्याच्या मुरगाव बंदरात दाखल झाले असून, गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्याने त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. ‘आयडा विटा’ नावाचे हे विदेशी क्रुझ जहाज मस्कत राष्ट्रातून विदेशी पर्यटकांना घेऊन गोव्यात आले असून यानंतर उशिरा संध्याकाळी जहाज पर्यटकांना घेऊन मंगळूरला जाण्यासाठी रवाना होणार आहे.ऑक्टोबर महिन्यात गोव्यातील पर्यटक हंगामाला सुरवात झाल्यानंतर ४ ऑक्टोबरला ह्या वर्षाचे पहिले विदेशी चार्टर विमान मोस्कोहून विदेशी पर्यटकांना घेऊन गोव्याच्या दाबोळी विमानतळावर पोहोचले होते. आज (दि.३) ‘आयडा विटा’ विदेशी क्रुज जहाज मुरगाव बंदरात दाखल झाले असून, ह्या वर्षाच्या गोवा पर्यटक हंगामातील गोव्यात पोहोचणारे हे पहिले विदेशी क्रुझ जहाज ठरले आहे. मस्कत राष्ट्रातून हे जहाज रविवारी मुरगाव बंदरात पोहोचले असून यात एकूण १५८७ विदेशी पर्यटक (११८१ विदेश पर्यटक तर ४०६ जहाजावरील अधिकारी व कर्मचारी) असल्याची माहिती मुरगाव बंदरातील सूत्रांनी दिली.रविवारी जहाज मुरगाव बंदरात पोहोचल्यानंतर यावरील विदेशी पर्यटकांचे गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे मोठ्या दिमाखात स्वागत करण्यात आल्याचे दिसून आले. यंदाच्या पर्यटक हंगामातील पहिले विदेशी क्रूझ जहाज गोव्यात पोहोचत असल्याने महामंडळाने येथे गोव्याच्या पारंपरिक संगीतासहीत, पारंपरिक नृत्यू तसेच इतर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. जहाज मुरगाव बंदरात दाखल झाल्यानंतर खाली उतरत असलेल्या विदेशी पर्यटकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे गोव्यात स्वागत करण्यात आल्याचे याप्रसंगी दिसून आले. मस्कतहून गोव्यात आलेले हे जहाज रविवारी उशिरा संध्याकाळी येथून मंगळूरला जाण्यासाठी रवाना होणार असून, तेथून ते कोची येथे जाणार असल्याची माहीती याप्रसंगी उपलब्ध करण्यात आली. येथे उपस्थित असलेल्या एमपीटी (मुरगाव बंदर) च्या कर्मचाऱ्यांनी माहिती देताना यंदाच्या पर्यटक हंगामातील पहिले क्रुझ जहाज गोव्यात दाखल झाल्याचे सांगून येणा-या काळात अन्य अनेक विदेशी क्रुझ जहाजे मुरगाव बंदरात पर्यटकांना घेऊन येणार असल्याची माहिती दिली. विदेशी पर्यटकांना क्रुझ जहाज गोव्यात घेऊन येणार असल्याने गोव्यातील पर्यटक क्षेत्राला याचा आर्थिकरीत्या उत्तम फायदा होणार असून यामुळे टॅक्सी तसेच इतर व्यवसायांना सुद्धा आर्थिकदृष्ट्या लाभ होणार असल्याचे म्हणाले. मुरगाव बंदरातून यापूर्वी दोन राष्ट्रीय क्रुझ जहाज कंपनीच्या सेवेची सुरुवात झालेली असून याचा सुद्धा गोव्यातील पर्यटक क्षेत्राला उत्तम फायदा होत असल्याची माहिती एमपीटी सूत्रांनी दिली.गोव्याच्या पर्यटक हंगाम्यात यंदा गोव्यात येणार ३१ विदेशी क्रुझ जहाजेपर्यटक हंगामातील पहिले क्रुझ जहाज रविवारी गोव्यात दाखल झाले असून यामुळे गोव्याच्या पर्यटक क्षेत्राला विविध प्रकारे चांगला फायदा होणार आहे. यंदाच्या गोवा पर्यटक हंगामाच्या काळात (मे महिन्यापर्यंत) मुरगाव बंदरात ३१ विदेशी क्रुज जहाजे येणार असल्याची माहीती सूत्रांनी देऊन सुमारे ५५ हजार विदेशी पर्यटक क्रुझ जहाजाच्या माध्यमाने गोव्यात येणार आहेत. यंदा गोव्यात ३१ विदेशी क्रुझ जहाजे येणार असल्याने याचा गोव्याच्या पर्यटक क्षेत्राला विविध प्रकारे फायदा होणार असला तरी मागच्या वर्षाच्या संख्येपेक्षा यंदा गोव्यात येणा-या विदेशी क्रुझ जहाजातील संख्येत कपात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागच्या पर्यटक हंगाम्यात गोव्यात ४० विदेशी क्रुझ जहाजे विविध राष्ट्रातून सुमारे ७७ हजार विदेशी पर्यटकांना घेऊन गोव्यात आलेली असल्याची माहीती सूत्रांनी दिली. मागच्या तुलनेत यंदा क्रुज जहाजाच्या संख्येत कपात झाल्याने याचा थोडाफार गोव्याच्या पर्यटक व्यवसायाला परिणाम होणार असे वाटते. दरम्यान गोव्यात येणाºया विदेशी क्रुज जहाजातील संख्येत वाढ करण्यासाठी याच्याशी संबंधीत असलेल्यांची चर्चा चालू असल्याची माहीती मुरगाव बंदरातील विश्वसनीय सूत्रांनी देऊन गोव्यात येणार असलेल्या विदेशी क्रुज जहाजाची संख्या ३१ वरून ३५ पर्यंत पोचण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.