शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

संपत्तीच्या वादातून गोव्यातील नेसाय येथे गोळीबार: संशयित फरार: घटनास्थळी सापडल्या दोन गोळया

By सूरज.नाईकपवार | Updated: November 2, 2023 13:02 IST

 लोकमत न्युजनेटवर्क मडगाव: संपत्तीच्या वादातून गोव्यातील दक्षिण गोवा येथील  नेसाय येथे गोळीबार करण्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री घडला. या ...

 लोकमत न्युजनेटवर्कमडगाव: संपत्तीच्या वादातून गोव्यातील दक्षिण गोवा येथील  नेसाय येथे गोळीबार करण्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री घडला. या प्रकारामुळे हा गाव हादरुन गेला. मायणा कुडतरी पोलिसांनी या गोळीबार प्रकरणी निलेश वेर्णेकर व अन्य दोन अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. संशयित सदया फरार आहे. घटनास्थळी पोलिसांना बदुंकीच्या दोन गोळयाही सापडल्या. एकूण तीन फायरिंग केल्याचा संशय आहे. भादंसंच्या ३३६ व शास्त्रात कायद्यातंर्गंत पोलिसांनी संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत भगत पुढील तपास करीत आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री अकराच्या दरम्यान गोळीबाराची वरील घटना घडली. कॉन्सी फर्नांडीस यांच्या घरासमोर एक जागा विकासीत करण्यात आली होती. कॉन्सीने दिवाणी न्यायालयात या प्रकरणात धाव घेतली होती. सदया हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.बुधवारी रात्री ब्लॅक टायगर या सुरक्षा एजन्सीचे मालक निलेश वेर्णेकर व अन्य दोघेजण घटनास्थळी आले व त्यांनी कॉन्सीच्या घराच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी त्या घरात आत फर्नांडीस कुटुबिय होते. सुदैवाने या गोळीबारा कुणी जखमी झाला नाही. गोळीबार केल्यानंतर संशयिताने घटनास्थळाहून पळ काढला.मागाहून यासंबधी पाेलिसांना कळविण्यात आल्यानंतर संबधितांनी घटनास्थळी जाउन पंचानामा केला. संशयितांचाही शोध घेतला मात्र ते  सापडू शकले नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी