शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबार प्रकरण: निलेशच्या पोलिस रिमांडात वाढ: १० नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी

By सूरज.नाईकपवार | Updated: November 6, 2023 17:16 IST

गोव्यातील दक्षिण गोव्यातील रालोय कुडतरी गोळीबार प्रकरणात मायणा कुडतरी पोलिसांनी अटक केलेल्या निलेश वेर्णेकर याच्या पोलिस रिमांडात वाढ झाली आहे.

मडगाव :  गोव्यातील दक्षिण गोव्यातील रालोय कुडतरी गोळीबार प्रकरणात मायणा कुडतरी पोलिसांनी अटक केलेल्या निलेश वेर्णेकर याच्या पोलिस रिमांडात वाढ झाली आहे. आता तो शुक्रवार दि. १० रोजी पर्यंत पोलिस कोठडीत असेल.आज सोमवारी  त्याची पाेलिस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयात रिमांडसाठी उभा केला असता, त्याला न्यायालयाने वरील पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, संशयिताने जामिन अर्जासाठी केलेल्या अर्जावरही आता बाल न्यायालयात दि. १० रोजी सुनावणी होणार आहे.

मागच्या आठवडयातबुधवारी रात्री रालोय-कुडतरी येथे गोळीबाराचा थरार घडला होता. या प्रकरणात पोलिसांनी ब्लॅक टायगर या सुरक्षा एजन्सीचा मालक नीलेशला गुरुवारी रात्री अटक केली होती. त्याचे अन्य दोन साथीदार अजूनही फरार आहेत. त्यांच्या मागावर सदया पोलिस आहेत.

निलेश याचा रक्तदाब वाढल्याने त्याला येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पोलिसांनी दाखल केले होते. नंतर त्याला रुग्णालयातून डिसचार्ज मिळाल्यानंतर पोलिसांनी पुन्हा त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली होती. पोलिस तपासात तो त्रुटक माहिती देत आहेत. मायणा कुडतरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत भगत पुढील तपास करीत आहेत.