शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री नार्वेकरसह तिघांची ४.१३ कोटींची मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 23:01 IST

गोवा क्रिकेट असोसिएशन (जीसीए) घोटाळा प्रकरणातील तिन्ही प्रमुख आरोपी तत्कालीन पदाधिकारी व माजी मंत्री दयानंद नार्वेकर, चेतन देसाई, बाळू ऊर्फ विनोद फडके आणि अकबर मुल्ला यांच्या एकूण ४.१३ कोटी रुपयांच्या मालमत्ता सक्तवसुली विभागाकडून (ईडी) जप्त केल्या आहेत.

पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशन (जीसीए) घोटाळा प्रकरणातील तिन्ही प्रमुख आरोपी तत्कालीन पदाधिकारी व माजी मंत्री दयानंद नार्वेकर, चेतन देसाई, बाळू ऊर्फ विनोद फडके आणि अकबर मुल्ला यांच्या एकूण ४.१३ कोटी रुपयांच्या मालमत्ता सक्तवसुली विभागाकडून (ईडी) जप्त केल्या आहेत. मनी लॉंडरिंगच्या अनुषंगाने इडीकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. जीसीए घोटाळा प्रकरणात ईडीतर्फे धडक कारवाई सुरू करण्यात आली असून आरोपींच्या मालमत्ता जप्त करण्यात अल्या आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून जीसीएसाठी अनुदान म्हणून देण्यात आलेली ६.९५ कोटी रुपयांची रक्कम तिघांकडून लाटण्याच्या प्रकरणात मनी लॉंडरिंगची शक्यताही उघडकीस आल्यामुळे इडीतर्फेही गुन्हा नोंदविण्यात आला होता आणि तपास सुरू करण्यात आला होता.  या प्रकरणात काही ठोस पुरावे आढळून आल्यामुळे इडीकडून ही जप्तीची कारवाई करण्यात आल्याची माहिती या विभागाकडून देण्यात आली.या प्रकरणात पोलीस खात्याच्या आर्थिक गुन्हा विभागाकडून गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर तिघांना अटकही करण्यात आली होती. नंतर काही दिवसांनी त्यांची जामीनवर सुटका झाली होती. या प्रकरणात एक नव्हे तर तीन वेगवेगळे गुन्हे नोंदविण्यात आले होते, त्यातील एका प्रकरणात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे, तर बाकीच्या दोन प्रकरणात अरोपपत्र दाखल करणे बाकी आहे. 

असा केला घोटाळा२००६ -०७ साली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून ६.९७ कोटी रुपये जीसीएला अनुदान जारी केले होते. या अनुदानाची रक्कम जीसीएच्या अधिकृत खात्यात जमा करण्याऐवजी कुंडई - फोंडा यथील शिरोडा अर्बन सहकारी सोसायटीत जीसीएच्या नावे बोगस खाते खोलून त्यात ही रक्कम जमा करण्यात आली. या बाबतीत एवढी गुप्तता ठेवण्यात आली की जीसीएच्या सर्वसाधरण बैठकीतही त्याचा उल्लेख करण्यात आला नाही. त्यानंतर विविध बोगस एजन्सीच्या नावावर टप्प्या टप्प्याने धनादेश जारी करून ही रक्कम लाटण्यात आली. चौकशी दरम्यान ही  रक्कम नार्वेकर यांच्यासह तिन्ही पदाधिकाºयांनीच उकळल्याचे आढळून आले असून ज्या एजन्सींच्या नावे धनादेश वठवले गेले त्यांना रक्कम मिळाली नसल्याचे तसेच त्यांचे जीसीएशी कोणतेही व्यवहार नसल्याचे कबुली जवाबही या एजन्सीकडून देण्यात आले आहेत.