शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅफिक सेन्टीनलचा दणका, गोव्याच्या अर्ध्या लोकसंख्येला चलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 22:24 IST

गोवा पोलिसांनी सुरू केलेल्या गोवा ट्रॅफिक सेन्टीनल योजनेचा दणका गोव्याच्या अर्ध्या लोकसंकेला बसला आहे.

पणजी - गोवा पोलिसांनी सुरू केलेल्या गोवा ट्रॅफिक सेन्टीनल योजनेचा दणका गोव्याच्या अर्ध्या लोकसंकेला बसला आहे. १४.५ लाख लोकसंख्येच्या गोव्यात ७.७४ लाख लोकांना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आल्याची माहिती गोवा पोलिसांनी जारी केली आहे. गोव्याचे महासंचालक मुक्तेश चंदर यांनी ही माहिती दिली. वर्षभरात एकूण ९.१९ कोटी रुपये या उल्लंघनांसाठी दंड वसुलीसाठी चलने पाठविण्यात आली आहेत. अतापर्यंत ६.४० कोटी रुपयांची वसुली झाली आहे अशी माहिती चंदर यांनी दिली. राज्यात ट्रॅफिक सेन्टीनल योजनेविषयी कितीही तक्रारी असल्या तरी ती बंद करण्याचा प्रश्नच नसल्याचे ते म्हणाले. या योजनेमुळे अपघात खाली आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. पोलिसांच्या सतावणुकीमुळे गोव्यात पर्यटक कमी झाले हा गोवा ट्युर व ट्रॅवल्स संघनेचा दावा त्यांनी फेटाळला. उलट पोलिसांमुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला. ड्रग्स विरोधी कारवाईतही चांगली कामगिरी बजावण्यात आल्याचा दावा करण्यात आहे. एनडीपीएस कायद्याखाली वर्षभरात २२२ प्रकरणात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यात २३७ संशयितांना अटक करण्यात आली. गेल्यावर्षी  १९० जणांना अटक करण्यात अली होती तर १६८ प्रकरणात गुन्हे नोंदविण्यात आले होते. मानवी तस्करीच्या बाबतीतील कारवाईतही ३२ टक्के वाढ झाली आहे. एकूण ५२ प्रकरणात ३९ जणांना अटक करण्यात आली आहे. ध्रूम्रपानासाठी १९७४०  प्रकरणात गुन्हे नोंदविले आहेत. काणकोण येथे विदेशी महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणात वेगाने कारवाई करून संशयिताला पकडणा-या पोलिसांचा महासंचालकांनी गौरव केला. काणकोण व पेडणे पोलीस स्थानकाचे निरीक्षक अनुक्रमे राजेंद्र प्रभुदेसाई व संदेश चोडणकर यांच्यासह इतर पोलीस यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीgoaगोवा