शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

फिल्म बाजारला प्रारंभ, विक्रमी २१७ सिनेमांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 01:13 IST

गोव्यात सुरु असलेल्या ४९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भाग असलेल्या एनएफडीसीच्या १२ व्या फिल्म बाजारला  विशाल भारद्वाज, रघुवरन, अभिषेक चौबे, सिध्दार्थ लाय कपूर यांच्यासारख्या देशविदेशातील सिनेमा क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवारपासून प्रारंभ झाला.

- संदीप आडनाईक

पणजी : गोव्यात सुरु असलेल्या ४९ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भाग असलेल्या एनएफडीसीच्या १२ व्या फिल्म बाजारला  विशाल भारद्वाज, रघुवरन, अभिषेक चौबे, सिध्दार्थ लाय कपूर यांच्यासारख्या देशविदेशातील सिनेमा क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवारपासून प्रारंभ झाला. ३५ विविध भाषेतील विक्रमी २१७ चित्रपट या बाजारमध्ये दाखविले जात आहेत. यात १0८ सिनेमे हे नवोदितांचे आहे, हे विशेष.जगभरातील चित्रपट निमांते, दिग्दर्शक, वितरक, फिल्म फेस्टिव्हल्सचे आयोजक आणि चित्रपट रसिकांसाठी एनएफडीसीचा हा फिल्म बाजार एक मोठे व्यासपीठ बनले आहे. ३८ देशातील ८३२ प्रतिनिधी या बाजारमध्ये सहभागी आहेत, त्यात १७८ जण विदेशी आहेत. चार दिवसाच्या या कार्यक्रमात विविध राज्यांसाठी एक खिडकी कार्यालये (फिल्म फॅसिलेशन आॅफिस), स्वतंत्र निर्मांत्यांची कार्यशाळा, नवे चित्रपट यांचा मेळाच येथील हॉटेल मेरियट येथे भरला आहे. दक्षिण आशियातील सर्वात मोठा चित्रपट व्यावसायिकांचे हे मार्केट आहे. यावर्षी भारतासह आॅस्ट्रेलिया, बांगला देश, भूतान, चीन, जर्मनी, श्रीलंका आणि अमेरिकेसारख्या देशातून १९ चित्रपट सहनिर्मिती प्रकल्पासाठी सहभागी झाले आहेत. यामध्ये हिंदी, मराठी. कोंकणी, नेपाळी, भोजपुरी, गेरो, दोजखा, तमिळ, मल्याळम आणि इंग्लिश भाषेतील प्रादेशिक चित्रपटांचाही समावेश आहे. यावर्षी फिल्म बाजारमार्फत २२ पूर्ण लांबीचे आणि २ लघुपटांची शिफारस मार्केटिंगसाठी करण्यात आली आहे. यासाठी देशभरातून १५३ मुख्य प्रवाहातील आणि १४ प्रादेशिक भाषेतील सिनेमांचा प्रस्ताव एनएफडीसीकडे आला होता. याशिवाय पूर्ण लांबीच्या १५३ सिनेमे, १८ माहितीपट आणि ६४ लघुपट अशा २१७ विक्रमी संख्येने सिनेमे या बाजारमध्ये दाखविण्यात येत आहेत. वेगवेगळ्या ३५ भाषेतील सिनेमे हे याचे वैशिष्ट्य असून त्यातील १६0 सिनेमांचे वर्ल्ड प्रिमियर यात होत आहे शिवाय १0८ नवोदितांचे सिनेमे या बाजारमध्ये दाखविण्यात येत आहेत.

टॅग्स :IFFIइफ्फी