लोकमत न्यूज नेटवर्कमडगाव : डॅनियली मेक्लॉग्लिन या आयरिश युवतीच्या खून प्रकरणात काणकोण पोलिसांनी शुक्रवारी प्रथम वर्ग न्यायालयात संशयित विकट भगत याच्याविरोधात तब्बल ३७२ पानी आरोपपत्र दाखल केले. ६४ साक्षीदारांची यादी या आरोपपत्राला जोडली आहे.काणकोण येथे होळीचा सण साजरा करण्यासाठी आलेल्या डॅनियली मेक्लॉग्लिन या २८ वर्षीय आयरिश युवतीचा १४ मार्च रोजी देवबाग-काणकोण येथे खून झाला होता. खून होण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झाला होता. या प्रकरणाने संपूर्ण युरोप हादरून गेला होता. या प्रकरणामुळे गोव्यातील पर्यटन क्षेत्रावरही काळे ढग जमले होते. संशयित विकट भगत याच्यावर खून, बलात्कार, अपहरण, चोरी पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल केले आहे.
डॅनियली मेक्लॉग्लिन खून प्रकरणी आरोपपत्र दाखल
By admin | Updated: June 10, 2017 02:36 IST