पणजी : देशाच्या विकासाचा मुद्दा गायब झाला आणि आता देशभक्तीचे भय पसरवलेले आहे. तुम्ही जर मोदींना मत दिले नाही, तर तुम्ही देशभक्त नाही, असे सध्याचे राजकीय वातावरण आहे. अशा वातावरणात तुम्ही मोदी-शहा-डोवाल यांना मत देत आहात, भाजपला नव्हे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केले.लोकमतच्या गोवा आवृत्तीचे संपादक राजू नायक यांच्या ‘जहाल आणि जळजळीत’, ‘हिरव्या बोलीचे शब्द’ आणि ‘ओस्सय’ या तीन पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात केतकर बोलत होेते. येथील मॅकेनिज पॅलेस सभागृहात हा सोहळा झाला. मंचावर राजू नायक, चित्रकार सुभाष अवचट उपस्थित होते.केतकर यांनी सुमारे तासभराच्या भाषणात देशातील राजकीय अवकाशाची मांडणी केली. ती करताना मोदी काळाचा उदय कसा झाला आणि सध्याची राजकीय स्थिती कशी आहे, याची मीमांसा केली.ते म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या निर्मितीपासून त्यांनी भाषणास प्रारंभ केला. यानंतर अण्णा हजारे यांचे आंदोलन ‘एंटरटेन्मेंट शो’ कसा ठरला, ते त्यांनी सांगितले. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर देशभर कशी वातावरणनिर्मिती केली गेली, याची नेमकी माहिती त्यांनी दिली.
देशभक्तीचे भय, विकासाचा मुद्दा गायब - कुमार केतकर; राजू नायक यांच्या तीन पुस्तकांचे गोव्यात प्रकाशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 05:08 IST