शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील विदेशी व्यक्तींच्या व्यवसायांची एफडीएकडून तपासणी, ड्रग्ज अड्डे उध्वस्त करण्यासाठी पोलिसांची मदत घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 20:36 IST

गोव्यातील किनारपट्टी भागांमध्ये ज्या विदेशी व्यक्ती विविध प्रकारचे क्लब्स, शॉक्स, हॉटेल्स चालविण्याचे धंदे करत आहेत, त्यांची यादी सरकारच्या अन्न व औषध प्रशासन खात्याने (एफडीए) तयार केली आहे.

पणजी : गोव्यातील किनारपट्टी भागांमध्ये ज्या विदेशी व्यक्ती विविध प्रकारचे क्लब्स, शॉक्स, हॉटेल्स चालविण्याचे धंदे करत आहेत, त्यांची यादी सरकारच्या अन्न व औषध प्रशासन खात्याने (एफडीए) तयार केली आहे. लवकरच एफडीएकडून पोलिसांच्या मदतीने अशा ठिकाणी तपासणी करून कारवाई केली जाईल. विदेशींकडून चालविले जाणारे अनेक शॉक्स, क्लब, हॉटेल्स तपासली जातील, असे आरोग्य खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी मंगळवारी येथे जाहीर केले.

राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. एफडीएने पोलीस प्रमुखांना पत्र लिहिले आहे व एक पोलीस उपनिरीक्षक आणि दोन-तीन पोलीस शिपाई असलेले पथक पुरविण्याची विनंती केली आहे. पोलीस प्रमुख त्यासाठी तयार झाले आहेत. यापुढे एफडीएकडून विदेशी व्यक्तींचे धंदे तपासले जातील. एफडीएला गृहित धरता येणार नाही. अन्न सुरक्षेच्यादृष्टीने एफडीए कारवाई करील. क्लब, शॉक्स, हॉटेल यांची स्वयंपाकगृहे तपासली जातील. तीन तारांकित ते पाच तारांकित अशा सगळ्य़ा हॉटेल्समध्ये एफडीएची पथके कधीही भेट देऊ शकतात. एफडीएचा परवाना घेतलेला नाही असे आढळल्यास स्वयंपाकगृहे सील केले जाईल, असे मंत्री राणे यांनी सांगितले. विदेशींकडून गोव्यात केले जाणारे काही व्यवसाय म्हणजे अंमली पदार्थ विक्री व्यवसायाची केंद्रे आहेत, असेही राणे म्हणाले. आरोग्य खात्यात लवकरच काही दुरुस्त्या करून अन्न व औषध प्रशासन यंत्रणोला ज्यादा अधिकार दिले जाणार आहेत हेही त्यांनी नमूद केले.

छोट्या विक्रेत्यांना दिलासागोव्यात सध्या मासळीची आयात बंद आहे. गोव्यापासून 60 किलोमीटर अंतराच्या परिघात जे छोटे मासळी व्यवसायिक स्वत:चा व्यवसाय करतात त्यांना दिलासा देण्यासाठी सरकार काही पाऊले निश्चितच उचलणार आहे.त्यासाठी आवश्यक ते उपाय योजण्याबाबत प्रक्रिया सुरू आहे. छोट्या व्यवसायिकांना मदत करावी असे आम्ही ठरवले आहे. फक्त छोट्या व्यवसायिकांच्या नावाखाली मोठे मासळी व्यापारी घुसू नयेत म्हणून काळजी घेतली जात आहे. कारण एकदा मोठे व्यापारी जर घुसले तर पुन्हा फॉर्मेलिन माशांचा वाद निर्माण होऊ शकतो, असे राणो म्हणाले.

टॅग्स :goaगोवा