शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांची उद्यापासून डोळे तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 18:35 IST

विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या तपासणीसाठी शिक्षकांना प्रशिक्षण दिले होते. या शिक्षकांनी २७ हजार विद्यार्थ्यांना दृष्टी दोष असल्याचे  सांगितले आहे

नारायण गावस - 

पणजी: राज्यातील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी व्हिजन फोर ऑल कार्यक्रम सरकारने जानेवारी महिन्यात आयोजित केला होता. यात शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी करण्याचे प्रशिक्षण दिले होते. यात शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची  तपासणी करुन जवळपास २९ हजार ७२५ विद्यार्थ्यांना  दृष्टीची समस्या जाणवली आहे. या विषयी आता उद्या ९ ते १३ सप्टेंबर पर्यंत प्रसाद नेत्रालय हॉस्पिटलच्या डोळ्यांच्या  ताज्ज्ञांमार्फत तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती  शिक्षण संचालक शैलेद्र  झिंगडे यांनी दिली. 

विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या तपासणीसाठी शिक्षकांना प्रशिक्षण दिले होते. या शिक्षकांनी २७ हजार विद्यार्थ्यांना दृष्टी दोष असल्याचे  सांगितले आहे. या विद्यार्थ्यंची आजपासून १३ सप्टेबरपर्यंत  सकाळी ९ ते सायं. ५ पर्यंत  तज्ञामार्फत तपासणी केली जाणार आहे. यात त्यांना सीएसआर मार्फत मोफत चष्मा दिला जाणार तसेच डोळ्याचा  मोठा आजार असेल तर त्यांना   प्रसाद नेत्रालयमध्ये  भरती केली जाणार. पण यासाठी  त्यांच्या पालकांची परवानगी  घेतली जाणार आहे. सर्व मोफत केले जाणार आहे. विद्यार्थ्याच्या डोळ्यांच्या काळजीसाठी हा उपक्रम राबविले जात आहे, असे शैलेंद्र झिंगडे यांनी सांगितले.

आता चतुर्थी आहे तसेच पुढे ऑक्टोबर  महिन्यामध्ये  विद्यार्थ्यांच्या परिक्षा आहे. तसेच  पुढे विविध कार्यक़्रम असल्याने आम्हाला आता लवकर  या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची  तपासणी करुन घ्यावी लागत आहे. पुढील पाच  दिवसात  या सर्व विद्यार्थ्यांच्या  डोळ्यांची तपासणी केली जाणारा आहे. यात तज्ञामार्फत या विद्यार्थ्यांची  ीतपासणी केली जाणार आहे. खरोखरच या विद्यार्थ्यांना दृष्टी दाेष असेल तर त्यांना पुढील उपचार केले जाणार  आहे, असेही झिंगडे म्हणाले. 

 

 

 

टॅग्स :goaगोवा