शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

तारांकित हॉटेलांना अतिरिक्त एफएआर

By admin | Updated: February 5, 2015 01:38 IST

पणजी : चार आणि पंच तारांकित हॉटेलांना बांधकामासाठी अतिरिक्त २0 टक्के चटई निर्देशांक (एफएआर) वाढवून देण्यास

पणजी : चार आणि पंच तारांकित हॉटेलांना बांधकामासाठी अतिरिक्त २0 टक्के चटई निर्देशांक (एफएआर) वाढवून देण्यास गोवा बचाव अभियानने तीव्र विरोध केला आहे. पत्रकार परिषदेत अभियानच्या निमंत्रक सबिना मार्टिन्स यांनी जनतेनेही याला प्रामुख्याने दोन मुद्द्यांवर विरोध करावा, असे आवाहन केले आहे. रस्त्यासाठी पुरेशी तरतूद, पार्किंग व सुरक्षा याबाबत मार्गदर्शक तत्त्वे सरकारने तयार केलेली नाहीत, तसेच एफएआरच्या बाबतीत होणारे उल्लंघन किंवा पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या जमिनीत बांधकाम करणाऱ्यांना शिक्षेची कोणतीही तरतूद केलेली नाही. या दोन्ही मुद्द्यांवर जनतेने अधिकाधिक हरकती २८ फेब्रुवारीपर्यंत त्या मुख्य नगर नियोजकांना पाठवाव्यात, असे आवाहन सबिना यांनी केले आहे. त्या पुढे म्हणाल्या की, शैक्षणिक संस्थांना एफएआर वाढवून देण्यामागचा सरकारचा उद्देश स्पष्ट झालेला नाही. गोव्यात जन्मदर अत्यंत कमी आहे. शाळा बंद पडू लागल्या आहेत असे असताना शाळांना एफएआर वाढवून देण्यामागे काय कारण, असा सवाल साबिना यांनी केला. शहरांमध्ये वाहतूक कोंडी सर्रास दिसून येते. शेतजमिनींमध्ये बांधकामे येत आहेत. काणकोणच्या ‘रुबी’ दुर्घटनेनंतरही सरकार धडा शिकलेले नाही, अशी टीका त्यांनी केली. २0२१ चा प्रादेशिक आराखडा जनतेसाठी खुला करून अंतिम स्वरूप देण्याचे सोडून सरकार हॉटेलमालकांचे चोचले पुरवित आहे. प्रादेशिक आराखडा नसल्याने ‘आम आदमी’ला साधे घर बांधताना अडचणी येतात त्याचे सोयरसुतक सरकारला नाही. आधीच किनारी भागात वाहतूक कोंडी, पार्किंगची समस्या आहे. पायाभूत व्यवस्था कोलमडून पडल्या आहेत त्यात भर म्हणून ही शिथिलता दिली जात आहे यावर त्यांनी कडाडून हल्ला चढविला. २0२१च्या प्रादेशिक आराखड्यातील चुका, त्रुटी असतील त्या जनतेला विश्वासात घेऊन, ग्रामपंचायतींना विश्वासात घेऊन दूर करता येतील; परंतु त्याबाबतही सरकार उदासीन असल्याचे साबिना म्हणाल्या. २0१0 च्या गोवा भू विकास व बांधकाम नियमांमध्ये दुरुस्ती सूचविणाऱ्या मसुद्याची अधिसूचना जारी केली असून याबाबतीत जनतेकडून ३0 दिवसांच्या आत हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. नियमात सुचविलेल्या दुरुस्त्यांमुळे खळबळ माजली आहे. हॉटेल लॉबीच्या सोयीसाठी हा खटाटोप असल्याचा आरोप सरकारवर होत आहे. पत्रकार परिषदेस गोवा बचाव अभियानच्या सचिव रेबोनी साहा, तसेच मिंगेल डिकॉस्ता उपस्थित होते. (प्रतिनिधी)