शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

गांधी जयंतीपूर्वीच सरकारकडून कॅसिनोंना मांडवीत राहण्यास मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 13:09 IST

जुगार, दारू हे सगळे महात्मा गांधी यांच्या तत्त्वांविरुद्ध असल्याने गोवा सरकार मांडवी नदीतील कॅसिनो जुगार महात्मा गांधी जयंतीदिनी बंद ठेवण्यास व्यवसायिकांना भाग पाडते.

पणजी - जुगार, दारू हे सगळे महात्मा गांधी यांच्या तत्त्वांविरुद्ध असल्याने गोवा सरकार मांडवी नदीतील कॅसिनो जुगार महात्मा गांधी जयंतीदिनी बंद ठेवण्यास व्यवसायिकांना भाग पाडते. गोव्यात दारु विक्रीही एक दिवस बंद असते. मात्र मांडवी नदीत कॅसिनो जुगाराच्या जहाजांना लोक विरोध करत असताना सरकारने मात्र कोणताही मोठा गाजावाजा न करता मांडवीतील कॅसिनोंना सहा महिने मुदतवाढ दिली आहे. गांधी जयंतीपूर्वी दोन-तीन अगोदरच सरकारने याविषयीचा प्रस्ताव मंजूर केला.

मांडवी नदीत कॅसिनो जहाजांची संख्या आता पाच ते सहा झालेली आहे. रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल कॅसिनो जुगाराच्या ठिकाणी होत असते. श्रीमंत गोमंतकीय आणि देश- विदेशातील धनिक पर्यटक येथे कॅसिनो जुगार खेळण्यासाठी गर्दी करतात. विरोधी पक्षनेतेपदी असताना मनोहर पर्रीकर यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना घेऊन कॅसिनोंना विरोध केला होता व आंदोलनही केले होते पण पर्रीकरांच्या नेतृत्वाखाली भाजपाची सत्ता आल्यानंतर कॅसिनोने मांडवीत जास्त हातपाय पसरले. कॅसिनोंविरुद्ध कारवाई किंवा कॅसिनोंचे अन्यत्र स्थलांतर तर झाले नाहीच, उलट त्यांना दर सहा महिन्यांनी मांडवी नदीत राहण्यासाठी मुदतवाढ दिली जाते. मुख्यमंत्री पर्रीकर हे इस्पितळात उपचार घेत असताना देखील सहा महिन्यांनी कॅसिनोंना मुदतवाढ देण्याची तारीख कधी चुकत नाही. एकंदरीत सरकारने कॅसिनोंची सर्व प्रकारची काळजी घेतली असून कॅसिनो व्यवसायिकही सर्व राजकीय पक्षांची काळजी घेत असल्याची टीका सोशल मीडियावरून होत आहे.

कॅसिनोंमध्ये ग्राहकांना मद्यही मोफत दिले जाते. गांधी जयंतीदिनी तरी कॅसिनो जुगार बंद ठेवले जावेत अशी मागणी काही वर्षापूर्वी गोव्यातील महिलांच्या संघटनांनी केली होती. त्यामुळे सरकारने गांधी जयंतीदिनी कॅसिनोंसाठी 24 तासांची बंदी लागू केली. त्या बंदीचे पालन केले जाते पण कॅसिनोंना मांडवी नदीतून हटविले जाईल. या आपल्या आश्वासनाला सरकारने हरताळ फासला आहे. मंत्रिमंडळाच्या एरव्ही बैठका होत नाहीत पण कॅसिनोंना मांडवी नदीत राहण्यासाठीची मुदत गेल्या 30 सप्टेंबर रोजी संपत होती. सरकारने गांधी जयंतीपूर्वी मंत्रिमंडळाच्या काही सदस्यांसमोर प्रस्ताव फिरवला व कॅसिनोंना मांडवी नदीत राहण्यासाठीचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. गोमंतकीय समाजातून याबाबत सरकारप्रती कडवट प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा