शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वेकडून नेपाळला रेल्वे डब्यांची निर्यात; शिरपेचात खोवला मानाचा तुरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 20:32 IST

आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात चांगली कामगिरी केलेल्या कोकण रेल्वे महामंडळाच्या शिरपेचात लवकरच आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार

मडगाव: आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात चांगली कामगिरी केलेल्या कोकण रेल्वे महामंडळाच्या शिरपेचात लवकरच आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार असून, कोकण रेल्वेकडून लवकरच नेपाळसाठी रेल्वे डब्याची निर्यात केली जाणार आहे. येत्या नवीन वर्षाच्या जानेवारी महिन्यात कोंकण रेल्वे दोन डेम्यू रॅक्स नेपाळला निर्यात करणार असून, कोकण रेल्वेची ही पहिलीच निर्यात ठरणार आहे.कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष संजय गुप्ता यांनी मंगळवारी मडगावात झालेल्या महामंडळाच्या 29व्या स्थापना दिनी बोलताना ही माहिती दिली. यापूर्वी कोकण रेल्वेला बिहारमध्ये रक्सूल व नेपाळमध्ये काठमांडू येथे प्रस्तावित रेल्वेमार्गाचे अभियांत्रिकी सर्व्हेक्षण करण्याचे काम मिळाले होते. त्यानंतर 10 मे 2019 रोजी कोकण रेल्वेने नेपाळ रेल्वेशी कोच निर्यातीच्या समझोता करारही केल्याची माहिती त्यांनी दिली.या स्थापना दिन कार्यक्रमात कोकण रेल्वेच्या महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तसेच जम्मू काश्मीर विभागाच्या उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कर्मचा-यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी व्यावसायिक विभागाचे संचालक एच. डी. गुजराती, कार्मिक विभागाचे संचालक सुभाषचंद्र गुप्ता, मुख्य पर्सनल अधिकारी के. के. ठाकूर व क्षेत्रीय रेल्वे व्यवस्थापक बी. बी. निकम हे उपस्थित होते.गोव्याबद्दल माहिती देताना गुप्ता म्हणाले, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या निधीतून मडगाव, करमळी व थिवी या तीन रेल्वे स्थानकांचा 25 कोटी रुपये खर्चून कायापालट करण्यात येणार आहे. आतापर्यंत गोव्यात वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर खासदार निधी योजनेखाली 11.80 कोटी रुपयांच्या सुविधा दिल्या गेल्या आहेत. आतापर्यंत गोवा व महाराष्ट्रातील सर्व स्थानकांवर वायफाय सेवा उपलब्ध असून लवकरच आता कर्नाटकातील स्थानकेही वायफाय सेवेने जोडली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दहा नवी रेल्वे स्थानकेसध्या कोकण रेल्वेतर्फे दहा नवी रेल्वे स्थानके उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून, पाच अतिरिक्त लुप लाईन्स सुरू केल्या जाणार आहेत. या नव्या रेल्वे स्थानकामध्ये इंदापूर, गोरेगाव रोड, सापेवामने, कलबनी, कडवाई, विरावली, खारेपाटण, अचिर्णे, मिरझन व इन्नाजे यांचा  तर लुप लाईनसमध्ये अंजणी, सावर्डा, राजापूर रोड, वैभववाडी रोड व मुर्डेश्वर स्टेशनचा समावेश असेल. रोहा ते वीर हा 46 किमी अंतराचा रेलमार्गाचे मार्च 2020 पर्यंत दुपदरीकरण केले जाणार असून, मार्च 2021 पर्यंत संपूर्ण कोकण रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण केले जाणार आहे.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीKonkan Railwayकोकण रेल्वे