लोकमत न्यूज नेटवर्क, साखळी : 'राज्यात ३० वर्षापूर्वी केवळ गोमेकॉमध्येच डायलेसिस उपचार केंद्र होते. मात्र, आता ही सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खासगी इस्पितळांमध्येही उपलब्ध आहे. यावरुन त्यावेळी किडनीचे आजार असलेल्या रुग्णांची संख्या वाढली असल्याचे स्पष्ट होते, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
साखळी येथे जागतिक हॉमिओपॅथी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सरकार हॉमिओपॅथीला प्रोत्साहन देण्यासाठी ठोस पावले उचलत आहेत. गोमंतकीयांना या क्षेत्रात पुढे यावे, स्वतःचे वेलनस सेंटर सुरू करावे त्यासाठी ईडीसीकडून आर्थिक मदतीचा हात दिला जात आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ सालापासून आयुष आरोग्यसेवेचा विस्तार झाला आहे.
केंद्र सरकारने स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले आहे. हॉमिओपॅथी उपचार पद्धतीत कुठलेही दुष्परिणाम नाहीत. हॉमिओपॅथीबाबत वेगळी ओळख निर्माण करण्याची गरज आहे. पूर्वी व आता त्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे.
पूर्वीच्या काळात हॉमिओपॅथी डॉक्टरांची संख्या फारच कमी होती. मात्र, आता ही संख्याही वाढत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातही हॉमिओपॅथी डॉक्टर उपलब्ध असून, अनेक रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी येतात. यावरून त्यांच्याकडे विश्वासाने पाहिले जाते.
डायलिसिस सेवेचा विस्तार
मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्यात तीन दशकांपूर्वी गोमेकॉतच डायलिसिस उपचार केंद्र होते. मी १९९८ साली जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली, तेव्हा गोमेकॉ, तसेच उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ, अशा तीन ठिकाणी डायलिसिस उपचार केंद्र होते. मात्र, आता त्याचा विस्तार प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत पोहोचला आहे. डायलिसिसपासून आपला बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक तपासणी करणे गरजेचे आहे.
राज्य सरकार सर्वाच्या कल्याणासाठी वैद्यकीय शिक्षण बळकट करणे, संशोधनाधारित उपचार पद्धतींना प्रोत्साहन देणे आणि प्रतिबंधात्मक आरोग्य उपक्रम राबविणे यासाठी कटिबद्ध आहे. गोव्यात आरोग्य आणि तंदुरुस्ती क्षेत्राला मोठ्या व्यवसाय क्षेत्रात विकसित करण्याची प्रचंड क्षमता आहे.
४० हजार महिलांची झाली तपासणी
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 'चेक्ड बाय दातोर' या उपक्रमाला महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत ४० वर्षांवरील सुमारे ४० हजार महिलांनी आरोग्य तपासणी केली आहे. त्यापैकी तीन ते चार टक्के महिलांनी पुढील तपासणी तसेच उपचारांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेवर भर देण्याचे, उपलब्ध वैद्यकीय सुविधांचा योग्य उपयोग करावा असे सांगितले. अनाथाश्रमांमध्ये शासनाच्या मदतीने वेलनेस सेवा सुरू करण्याच्या संधींबाबत त्यांनी प्रकाश टाकला. स्थानिकांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
Web Summary : Goa expands dialysis access beyond hospitals to primary health centers. Chief Minister Sawant highlights government efforts to promote homeopathy, offering financial aid for wellness centers. He emphasizes preventative care and the success of women's health checkup programs, advocating for utilizing available medical facilities.
Web Summary : गोवा में डायलिसिस की सुविधा अब प्राथमिक स्वास्थ्य केंद्रों तक पहुंची। मुख्यमंत्री सावंत ने होम्योपैथी को बढ़ावा देने के सरकारी प्रयासों पर प्रकाश डाला, और वेलनेस सेंटर के लिए वित्तीय सहायता की पेशकश की। उन्होंने निवारक देखभाल और महिलाओं के स्वास्थ्य जांच कार्यक्रमों की सफलता पर जोर दिया।