शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

स्मृती इराणींना 'सिली सोल्स' प्रकरणातून वाचवण्यासाठीच अबकारी नियमात दुरुस्ती, सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांचा आरोप

By किशोर कुबल | Updated: October 16, 2022 17:54 IST

Smriti Irani : सरकारने अबकारी कायद्यात केलेली नियम दुरुस्ती केंद्रीय महिला बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांना वादग्रस्त 'सिली सोल्स बार अँड रेस्टॉरंट' प्रकरणातून वाचवण्यासाठीच असल्याचा आरोप होत आहे.

- किशोर कुबल पणजी : सरकारने अबकारी कायद्यात केलेली नियम दुरुस्ती केंद्रीय महिला बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांना वादग्रस्त 'सिली सोल्स बार अँड रेस्टॉरंट' प्रकरणातून वाचवण्यासाठीच असल्याचा आरोप होत आहे.

सरकारने अबकारी नियम शिथिल करताना दुसऱ्याच्या परवान्यावर वीस टक्के अतिरिक्त फी भरून कोणीही मद्यालय चालवू शकतो, अशी तरतूद केली आहे. दुसऱ्याच्या नावावर असलेला परवाना हस्तांतरित करण्यास निर्बंध होते ते दूर केले आहेत.

सिली सोल्स प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणारे समाज कार्यकर्ते आयरिस रॉड्रिग्स यांनी या नियम दुरुस्तीवरून सरकारला फटकारले आहे. ते म्हणाले की, अबकारी नियमांमध्ये सुधारणा सार्वजनिक हितासाठी नाही तर बार प्रकरणात स्मृती इराणी यांच्या कुटुंबाला संरक्षण देण्यासाठीच करण्यात आली आहे. सुधारित नियम हे १९६४ च्या गोवा अबकारी शुल्क कायदा  आणि विशेषत: कलम १०४ (१) च्या विरोधात असल्याचे रॉड्रिग्स यांनी नमूद केले आहे. ते म्हणतात की, मूळ कायद्याला बगल देता येणार नाही.

 स्मृती इराणींचे कुटुंबिक चालवत असलेल्या आसगांव येथील सिली सोल्स बारचा परवाना दिवंगत अँथनी द गामा यांच्या नावावर आहे.  मृत व्यक्तीच्या नावाने परवान्याचे नूतनीकरण करण्यात आले. १७ मे २०२१ रोजी अँथनी द गामा यांचे निधन झालेले आहे.

सिली सॉल्स  बार जेथे आहे ती मालमत्ता एटऑल फूड अँड ब्रिव्हरेजीसला भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचे अँथनी यांच्या कुटुंबाने गेल्या आठवड्यात सांगितले होते.  गोवा अन्न आणि औषध प्रशासनाकडून मिळालेल्या भाडेतत्त्वावरील करारावरून असे दिसून आले की, ही जागा १ जानेवारी २०२१ पासून दहा वर्षांच्या कालावधीसाठी ५० हजार रुपये मासिक भाड्याने एटऑल फूड अँड बेव्हरेजीसला दिली आहे. उग्रया मर्कंटाइल प्रायव्हेट लिमिटेडसह स्मृती इराणी यांचे पती झुबिन इराणी संचालक आहेत. सिली सॉल्स बारद्वारे वापरलेला जीएसटी क्रमांक देखील एटॉल फूड अँड ब्रेवरेजीसचा आहे. सामान्य जनतेचे हाल होत असताना सरकार आपल्या राजकीय बॉसना वाचवण्यासाठी अक्षरश: रांगत असल्याची टीका रॉड्रिग्स यांनी  केली आहे. 

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीgoaगोवा