शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक युवा गोमंतकीयाला रोजगार, नवे धोरण लवकरच : मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 12:27 IST

गोव्यातील प्रत्येक युवकाला रोजगाराची संधी दिली जाईल. त्यासाठी सरकारचे नवे रोजगार धोरण लवकरच जाहीर केले जाईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्री पर्रीकर हे सध्या उपचारांसाठी अमेरिकेत असून

पणजी : गोव्यातील प्रत्येक युवकाला रोजगाराची संधी दिली जाईल. त्यासाठी सरकारचे नवे रोजगार धोरण लवकरच जाहीर केले जाईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्री पर्रीकर हे सध्या उपचारांसाठी अमेरिकेत असून तिथून त्यांनी व्हीडीओद्वारे गोव्यात आपला संदेश पाठवला आहे. पर्रीकर येत्या रविवारी गोव्यात परतत आहेत. सोमवारपासून ते कामकाज सुरू करतील.

गोव्यात सध्या प्रत्येक युवा-युवती सर्वच मंत्री, आमदारांकडे नोकऱ्याच मागत आहे. सरकारी नोकर भरतीही मंदावली आहे आणि मोठ्या प्रमाणात बडे उद्योगही गोव्यात येत नाहीत. तथापि, मुख्यमंत्री पर्रीकर यांनी केलेल्या घोषणोमुळे युवा वर्गाच्या आशा थोड्या पल्लवित झाल्या आहेत. मात्र, काँग्रेसचे प्रवक्ते आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स म्हणाले की, गोमंतकीय युवक सरकारवर व भाजपवर प्रचंड नाराज आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीवेळी गोमंतकीय युवकांची मते मिळावीत म्हणून र्पीकर हे उगाच घोषणा करत आहेत. 2012 साली सरकार स्थापन केल्यानंतर पाच वर्षात पन्नास हजार रोजगार संधी  निर्माण करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती, पण युवकांचा मोठा अपेक्षाभंग झाला. मुख्यमंत्री म्हणाले, की यावर्षी आम्ही स्थानिक युवकांना रोजगार देण्यासाठी नवी कृती योजना तयार केली आहे. जे उद्योग व व्यवसाय स्थानिकांना रोजगार संधी देण्याबाबत प्राधान्य देतील त्यांना आम्ही अनुदान व सवलती देणार आहोत. यामुळे पुढील एक किंवा दोन वर्षात गोव्यात बेरोजगार युवक म्हणून कुणी राहणार नाही. युवकांमध्ये उत्साह निर्माण करणारे गोवा सरकारचे रोजगारविषयक धोरण लवकरच जाहीर केले जाईल. येत्या दोन वर्षात गोवा राज्य बेरोजगारीपासून मुक्त होईल अशी आपल्याला आशा वाटते. दरम्यान, गोवा सरकारने नुकतेच आयटी धोरण जाहीर केले आहे. आयटी उद्योगांसाठी अनेक सवलती व अनुदान सरकारने आयटी धोरणातून जाहीर केले आहे. स्टार्ट अप धोरणही यापूर्वी जाहीर केले गेले. आयटी धोरणाद्वारे गोव्यात आयटी पार्क, इलेक्ट्रॉनिक सिटी वगैरे उभी करण्याचा संकल्प सरकारने सोडला आहे. गोव्याच्या आयटी क्षेत्रत यापुढील काळात आठ हजार रोजगार संधी निर्माण होतील असे आयटी मंत्री रोहन खंवटे यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा