शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ईपीएफच्या लाचखोर सहआयुक्ताला सीबीआयकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 22:03 IST

कामगार संबंधी नियमांचे उल्लंघनाबद्दल कारवाई टाळायची असेल तर लाच द्या अशी मागणी करणाऱ्या भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) खात्याच्या सहाय्यक भविष्य निधी आयुक्त रवींद्रनाथ रॉय याला सीबीआयने रंगेहाथ अटक केली.

पणजी: कामगार संबंधी नियमांचे उल्लंघनाबद्दल कारवाई टाळायची असेल तर लाच द्या अशी मागणी करणाऱ्या भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) खात्याच्या सहाय्यक भविष्य निधी आयुक्त रवींद्रनाथ रॉय याला सीबीआयने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई सीबीआयच्या गोवा विभागाकडून (भ्रष्टाचार विरोधी विभाग) सकाळी करण्यात आली. छापा सकाळी १०च्या सुमारास टाकण्यात आला होता आणि रात्री उशिरापर्यंत तो चालू ठेवण्यात आला होता. संशयित रवींद्रनाथ याच्या कार्यालयातील सर्व कागदपत्रांची छाननी चालू होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या निवासस्थानीही छापा टाकण्याच्या हालचाली सुरू होत्या. या कारवाईदरम्यान सीबीआय अधिका-यांना काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे मिळाली असून त्यांनी ती जप्त केली आहेत.समीर महाले या कंत्राटी कामगार पुरविणा-या व्यक्तीकडून रवींद्रनाथच्या विरोधात सीबीआयकडे तक्रार नोंदविली होती. महाले यांच्यावर भविष्य निर्वाह निधी आयुक्तालयाच्या कार्यालयातून कर्मचारी नियम उल्लंघनाचा ठपका ठेवण्यात आला होता. या प्रकरणात कारवाई व्हायला नको असेल तर लाच देऊन मोकळा हो, असे त्याने तक्रारदाराला सांगितले होते. ही लाच लाखात होती परंतु निश्चित रक्कम सीबीआयकडून जाहीर करण्यात आली नाही. महाले यांनी ही गोष्ट सीबीआयला कळविल्यानंमतर सीबीआयकडून व्यवस्थितपणे सापळा रचून कारवाई केली आणि रवींद्रनाथ याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यास यश मिळविले.या दरम्यान रवींद्रनाथ व तक्रारदार यांच्यातील संवादाचे रेकॉर्डिंगही सीबीआयकडून करण्यात आले आहे. तसेच पैसे घेतल्याचे पुरावे म्हणून त्याच्या ठशेही घेण्यात आले आहेत. शिवाय दोघांत झालेले फोनवरील संवादही रेकॉर्ड करण्यात आले आहेत. यामुळे संशयिताच्या अडणी वाढल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी याच खात्याच्या आणखी एका अधिका-याला लाचखोरी करताना सीबीआयने पकडले होते.