शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

2020पर्यंत कोकण रेल्वेच्या पूर्ण मार्गाचे विद्युतीकरण, मडगाव रेल्वे स्थानकाचाही विस्तार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 19:38 IST

येत्या 2020 पर्यंत कोकण रेल्वे मार्गावरून डिझेल इंजिनवर धावणा-या सर्व गाड्या बंद होणार असून, या मार्गावरून केवळ विजेवर चालणा-या गाड्याच धावणार आहेत.

मडगाव: येत्या 2020 पर्यंत कोकण रेल्वे मार्गावरून डिझेल इंजिनवर धावणा-या सर्व गाड्या बंद होणार असून, या मार्गावरून केवळ विजेवर चालणा-या गाड्याच धावणार आहेत. रोहा ते मंगळुरुपर्यंत 740 किमीच्या मार्गाचे एकूण 1400 कोटी रुपये खर्चून विद्युतीकरण करण्याचे काम सध्या हाती घेतले असून येत्या वर्षअखेर ते पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.विजेवर धावणा-या गाड्यांमुळे डिझेलवरील बराच मोठा खर्च कमी होणार असून, त्याशिवाय पर्यावरणासाठीही या बदलाचा फायदा होईल अशी माहिती कोकण रेल्वेचे सहाय्यक सरव्यवस्थापक (जनसंपर्क) बबन घाटगे यांनी दिली. ते म्हणाले, सध्या दक्षिण भागात मंगळुरुपर्यंत तर पश्चिम भागात रोहापर्यंतच्या मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. राहिलेल्या मार्गाचे विद्युतीकरण लवकरात लवकर व्हावे यासाठी रोहा ते वेर्णा तसेच वेर्णा ते मंगळुरु अशा दोन वेगवेगळ्या एजन्सीकडून काम केले जात आहे.कोकण रेल्वेने सध्या विस्तारीकरणाचेही काम हाती घेतले असून, वेर्णा ते रोहा दरम्यानच्या 420 किमी मार्गाचे दुपदरीकरण करण्याचे काम या वर्षाअखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे. गोव्यातील मुख्य रेल्वे स्थानक असलेल्या मडगाव रेल्वे स्थानकावर पाचवे प्लॅटफॉर्म बांधण्याचे काम सध्या सुरू असून त्याशिवाय या स्थानकाला आणखी एका पटरीची जोड देण्यात येणार आहे. या विस्तारानंतर गोव्यातील पर्यटनाला अधिक जोड मिळेल, अशी अपेक्षा घाटगे यांनी व्यक्त केली.या विस्ताराअंतर्गत कोकण रेल्वे 11 नव्या स्थानकांचा विस्तार करणार असून याशिवाय कोकण रेल्वे मार्गावर आठ लुपलाईन्स सुरु करण्यात येणार आहे. मुर्डेश्वर येथे लुपलाईन सुरू झाली असून इतर ठिकाणी डिसेंबर अखेरपर्यंत त्या सुरू होतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :railwayरेल्वे