शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक शिस्तीमुळे मागच्या वर्षी दक्षिण गोव्यात अपघाती मृत्यूत घट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 16:17 IST

मडगाव - वाहतूक नियम भंग करणा-यांवर कडक कारवाईचे सत्र पोलिसांनी आरंभविल्याने गोवा राज्यातील दक्षिण गोवा जिल्हयात अपघाताच्या घटनेतही घट ...

मडगाव - वाहतूक नियम भंग करणा-यांवर कडक कारवाईचे सत्र पोलिसांनी आरंभविल्याने गोवा राज्यातील दक्षिण गोवा जिल्हयात अपघाताच्या घटनेतही घट झाल्याचे आढळून आले असून, मागच्या वर्षी 2018 साली दक्षिण गोव्यात अपघाती मृत्यूच्या 92 घटना घडल्याची नोंद पोलीस दफ्तरी आहे. 2017 साली या जिल्हयातील विविध ठिकाणी अपघाती मृत्यूच्या एकूण 121 घटना घडल्या होत्या. वाहतुकीला शिस्त आणण्यासाठी पोलिसांनी वाहन नियमाचा भंग करणा-यांवर कडक कारवाईचे सत्र सुरू केले आहे. याचा परिणामही आता दिसत असून, अपघाताच्या घटनाही कमी होउ लागलेल्या आहेत.मागच्या वर्षी अपघाती मृत्यूच्या एकूण 92 घटना घडल्या तर अन्य अपघाताच्या एकूण 215 घटनांची नोंद झाली असून, त्यातील 210 प्रकरणांचा तपास पूर्ण झाला असल्याची माहिती दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिली. 92 अपघाती मृत्यू पैकी सर्वात जास्त 20 अपघाती मृत्यू मायणा - कुडतरी पोलीस ठाण्याच्या हददीत घडलेले आहेत. तर फोंडा येथे पंधरा, वेर्णा चौदा, वास्को 9, फातोर्डा 12, व इतर अन्य ठिकाणाच्या पोलीस हददीत घडलेले आहेत.भरवेगाने व निष्काळाजीपणे वाहने हाकल्याने तसेच दारुच्या नशेत वाहने चालविल्याने जास्त अपघात घडले असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.  2016 साली जिल्हयात 132 अपघाती मृत्यूच्या घटनेंची नोंद झाली होती. तर 317 किरकोळ अपघात झाले होते. तर 2015 साली 128 अपघाती मृत्यूंची नोंद पोलीस दफ्तरी आढळून येत आहे.  त्यावेळी किरकोळ अपघाताची आकडेवारी 343 इतकी होती. 2014 साली 107 अपघाती मृत्यूची नोंद असून, 297 अन्य अपघात आहेत.2013 साली 88 अपघाती मृत्यू घडले होते.व 230 अन्य अपघात घडले होते. तर 2012 साली दक्षिण गोवा जिल्हयात 91 अपघाती मृत्यू व 296 किरकोळ अपघाताची नोंद पोलीस दफ्तरी नोंद आहे. 

टॅग्स :goaगोवाTrafficवाहतूक कोंडी