शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

थोबाडीतही पडली व निलंबनही; आयपीएसला रंगेलपणा भोवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 10:08 IST

निलंबनामुळे आता त्याच्या वेतनावर आणि इतर भत्यांवरही निर्बंध येणार असून निलंबनाचा आदेश हा तात्काळ लागू होत असल्याचेही म्हटले आहे. 

वासुदेव पागी

पणजी : गोव्याचे आयपीएस अधिकारी पोलीस उपमहानिरीक्षक ए कोन यांना ऐय्याशी व रंगेलपणा चांगलाच भोवला. आधी युवतीकडून मार खावा लागला तर आता सेवेतूनगी निलंबित करण्यात आले आहे. डीआयजी कोन याला कळंगुट येथील नाईट क्लबमधील युवतीशी केलेल्या गैरवर्तनासाठी सेवेतून निलंबित करण्याचा आदेश गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आला आहे.  

निलंबनामुळे आता त्याच्या वेतनावर आणि इतर भत्यांवरही निर्बंध येणार असून निलंबनाचा आदेश हा तात्काळ लागू होत असल्याचेही म्हटले आहे. कोन याने कळंगुटमधील एका नाईट क्लबमध्ये एका युवतीला गैरपद्धतीने स्पर्श केला होता. त्यामुळे त्या युवतीने त्यांच्या थोबाडीत मारली होती. या घटनेचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला होता. 'लोकमत'मधून हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर गोवा विधानसभेतही हे प्रकरण गाजले होते. त्यांच्याविरुद्ध उशिरा आदेश जारी करून त्याला कारवाई करण्यात येणार असल्याचे सेवेतून निलंबित करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. तसेच त्याची अंतर्गत चौकशीही सुरू करण्यात आली होती. या चौकशीत तो दोषी आढळल्यामुळे त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या यापूर्वीच काढून घेण्यात आल्या होत्या. केंद्रीय गृहमंत्रालयाला त्याच्या या कारनाम्याची माहिती देणारे पत्र गोवा पोलीस महासंचालकांनी पाठविले होते. त्यामुळे कोन याच्या  निलंबनाचा आदेश अपेक्षितही होता.

 निलंबन काळात त्याला पणजी मुख्यालयात हजर रहावे लागणार आहे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय गोवा सोडण्यासही मनाई करण्यात आली आहे.

टॅग्स :goaगोवा