शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

थेट रक्कम नाही तर कार, फ्लॅट स्वरूपात घेतला जातोय 'हुंडा'

By समीर नाईक | Updated: June 8, 2025 09:09 IST

गोव्यातही अप्रत्यक्षपणे हुंडा घेणे सुरूच : अमानुष छळाच्या घटनांची मात्र नाही

समीर नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: देशभरात लग्नात हुंडा न दिल्याने होणारे महिलांचे छळ व शेवटी विवाहितेच्या जिवावर बेतल्याच्या घटना वाढत असताना, सुदैवाने गोव्यात मात्र असे टोकाचे छळ झाल्याच्या घटना नाहीत. मात्र, हुंडा घेतलाच जात नाही, असेही नाही. गोव्यात अप्रत्यक्षपणे मोठा हुंडा घेतला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

आता हुंडा म्हणून कोणी थेट रक्कम मागत नाही तर हुंड्याचे स्वरूप बदलले आहे. दिल्या घरी आपली मुलगी सुखी राहावी, या प्रांजळ भावनेपोटी मुलीचे आई-वडील सर्व पुरवत असतात. गोव्यातही हुंडा घेतला जातो. मात्र, त्याचे स्वरूप बदलल्याची माहिती मिळाली आहे. रकमेच्या बदल्यात लाखो रुपयांच्या वस्तू आता भेट म्हणून दिल्या जात आहेत. गाडी, फ्लॅट, व्यावसायासाठी आर्थिक मदत, अशा प्रकारे हा हुंडा पुरवण्यात येत आहे. जेव्हा लग्नाची बोलणी सुरू असते, तेव्हाच 'अप्रत्यक्ष हुंड्याबद्दल' ही ठरते.

ईर्ष्या वाढली

सध्या अलिशान आणि सर्वात हटके लग्न सोहळे करण्यासाठी युवक-युवतींचा कल वाढलेला दिसत आहे. मित्रांमध्ये जर कुणी वेगळ्या पद्धतीने लग्नसोहळा केला, तर त्यापेक्षा अधिक वेगळे आपण काय करू, अशी ईर्ष्याच सुरू आहे. मग, त्यासाठी आई-वडिलांना कितीही आर्थिक कसरती करावा लागल्या, तरी त्याचा विचार केला जात नाही.

खर्चाची लाखोंची उड्डाणे...

 लग्नातील विविध ट्रेंड पाहता एका लग्नाला कमीतकमी १५ ते २० लाख रुपये खर्च येत असतो, असे काही पालक, युवा जोडप्यांशी संवाद साधल्यावर समोर आले. दाग-दागिने वगळून केलेला हा खर्च असतो. मग त्यात प्री-वेडिंग, हळद समारंभ, संगीत समारोह, जेवण, फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी, कपडे यांचा खर्च लाखोंची उड्डाणे घेत आहे. अनेकजण तर प्री-वेर्डीग किंवा हळदी समारंभासाठी चार ते पाच लाख रुपये खर्च करतात. लग्नातील जेवण्याचे दर जवळपास दोन लाखांच्यावर पोहोचले आहेत.

पूर्वीसारखे थेट हुंड्याचे प्रकार आता राहिलेले नाहीत. पण, कुठल्या ना कुठल्या स्वरूपात हुंडा दिलाच जातो. तसेच, लग्न सोहळेही खर्चिक झाले आहेत. समाजातील प्रतिष्ठेसाठी लग्न सोहळे मोठे व्हायचे आता सोशल मीडियाचे लक्ष वेधून घेण्यासाठीही सोहळे भव्यदिव्य केले जात आहेत. अनेक लग्न सोहळे कर्ज काढून केली जातात आणि हे थांबायल हवे. नव्या पिढीने अवाढव्य खर्च टाळावा. - नमन सावंत, साहित्यिक

टॅग्स :goaगोवा