शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विचलीत होऊ नका, मनोज परबची आरजींना भावनिक हाक

By वासुदेव.पागी | Updated: November 30, 2023 16:31 IST

मनोज परब यांनी एक व्हिडिओ जारी केला असून त्यात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अनेक सूचना केल्या आहेत.

पणजी: रिवोल्युशनरी गोवन्सच्या विरोधात सुरू असलेली बदनामीची मोहीम पाहून बिथरून जाऊ नका आणि आपल्या मार्गावरून ढळू नका, आपल्या निश्चयावर अढळ राहून काम करा अशी भावनिक हाक रिवोल्युशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब यांनी आपल्या कार्यकर्त्यांना घातली आहे. मनोज परब यांनी एक व्हिडिओ जारी केला असून त्यात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना अनेक सूचना केल्या आहेत. व्हिडीओत त्यांनी कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. आरजीला बदनाम करण्यासाठी आपल्या विरोधकांकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. विरोधकांच्या काव्याला बळी पडू नका. त्याकडे दुर्लक्ष करा. शांततेच्या मार्गाने चालू असलेली चळवळ चालूच ठेवा. आंदोलन थांबता कामा नये. कुणीही किती आरोप करतात ते करू दे. त्याचा स्वत:वर परिणाम होऊ देऊ नका असे आवाहन त्यांनी केले आहे. आरजी कार्यकर्ते आपल्या एका शब्दासाठी मोठी जोखीम घेऊन कसे झटतात हे सांगताना परब आपले अश्रू लपवू शकले नाहीत.

रोजगाराची समस्या, घराची समस्या , कर्जांचे डोंगर हे सर्व सोसतानाच आरजीसाठी काम करणारे कार्यकर्ते आरजीची ताकद असल्याचे ते म्हणाले. आपल्या पक्षाकडे केवळ दीड लाख रुपये शिल्लक असून पक्षाच्या कार्यालयाचे भाडे थकले आहे, कार्यक्रम करण्यासाठी पैसे नाहीत, कार्यकर्त्यांना चहा पाणी देण्यासाठीही पैसे नाहीत. परंतु अशा परिस्थितीतही आपले काम थांबणार नाही असे त्यांनी सांगितले. मोठे बिल्डर आणि स्क्रॅपयार्डवाले मोठ्या देणग्या देण्यासाठी तयार आहेत, परंतु आपला पक्ष कधीही तत्वांशी तडजोड करणार नाही असे त्यांनी या व्हिडिओत सांगितले.

टॅग्स :goaगोवा