शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

पणजीमध्ये मुलांना चावणाऱ्या कुत्र्याच्या मालकाला अटक

By वासुदेव.पागी | Updated: August 22, 2023 16:50 IST

लहान मुलांचा चावा घेऊन त्यांना गंभीररित्या जखमी करणाऱ्या रॉटविलर जातीच्या कुत्र्याच्या ताळगाव येथील मालकाला पणजी पोलिसांनी अटक केली आहे. 

पणजी:  लहान मुलांचा चावा घेऊन त्यांना गंभीररित्या जखमी करणाऱ्या रॉटविलर जातीच्या कुत्र्याच्या ताळगाव येथील मालकाला पणजी पोलिसांनी अटक केली आहे. 

५ वर्षे वयाचा मुलगा आणि त्याची ६ वर्षांची बहीण यांच्यावर  रॉटविलर जातीच्या कुत्र्यांनी हल्ला करून त्यांना गंभीररित्या जखमी करण्यात आल्यामुळे वातावरण बरेच तापले असून संतप्त ताळगाव वासियांनी कुत्र्याच्या मालकाविरुद्ध कारवाईची मागणी केली होती. पणजी पोलिसांनी त्या नुसार कारवाई करताना कुत्र्याचे ताळगाव येथील मालक माधवराव चव्हाण याला अटक केली आहे.

सोमवारी लोकांनी कुत्र्याच्या मालकाला घेराव घालून जाब विचारला होता. ताळगावचे सरपंच जानू रोजारियो यांनीही या बाबतीत आक्रमक भुमिका घेतली होती. माधवराव यांनी या घटनेबद्दल माफी मागितली होती आणि कुत्र्यांना आठवडाभरात इतर ठिकाणी हलविण्यात येणार असल्याचे सांगितले होते. तसेच  ज्या मुलांना कुत्र्यांनी जखमी केले त्या मुलांच्या औषधोपचाराचा खर्चही देण्याचे त्यांनी कबूल केले होते. औषधोपचाराचा खर्च करून तसेच माफी मागूनही माधवराव कारवाईपासून बचावू शकत नाही असेही लोकांनी सोमवारीच सांगितले होते.

कुत्र्यांच्या या हल्ल्यामुळे दोन लहान भावंडांचा जीव धोक्यात पडल्यामुळे या घटनेची गोवा राज्य बाल संरक्षण आयोगानेही घेतली आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणात कारवाई केली जाणारच असे आयोगाचे आयुक्त पिटर बॉर्जीस यांनी म्हटले आहे.  पोलिसांनीही नेमकी तशीच भुमिका घेताना त्याला अटक केली आहे. दरम्यान कुत्र्यांनी चावा घेऊन जबर जखमी करण्यात आलेली लहान भावंडांची प्रकृती आता स्थीर असून ती धोक्याबाहेर आल्याची माहिती गोमेकॉच्या सूत्रांकडून देण्यात आली. दोघांवरही गोमेकॉत उपचार सरू आहेत.

टॅग्स :goaगोवा