शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोमेकॉत डॉक्टरांची जोरदार निदर्शने; आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी जाहीर माफी मागण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 11:14 IST

सकाळी सर्व निवासी डॉक्टर, कन्सल्टंट स्कचे डॉक्टर आणि विद्यार्थीही या निदर्शनात उतरले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: गोमेकॉच्या कॅज्युअल्टी विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांच्या अपमान प्रकरणी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी त्याच जागी येऊन जाहीर माफी मागावी, अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे. त्याचबरोबर या विभागात येऊन बेकायदेशीरपणे व्हिडिओग्राफी करणाऱ्या कॅमेरामनविरुद्ध गुन्हा नोंद करावा, अशी मागणी करत गोमेकॉतील डॉक्टरांनी डीनच्या कार्यालयासमोर सोमवारी सकाळी जोरदार निदर्शने केली. 

सकाळी सर्व निवासी डॉक्टर, कन्सल्टंट स्कचे डॉक्टर आणि विद्यार्थीही या निदर्शनात उतरले होते. गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्या कार्यालयासमोरच निदर्शने करताना विद्यार्थी दुपारपर्यंत ठाण मांडून होते. ही निदर्शने गोमेकॉच्या निवासी डॉक्टर संघनेच्या बॅनरखाली करण्यात आली. 'आम्हाला न्याय हवा, व्हीआयची कल्चर बंद करा', अशा घोषणा घोषणांनी गोमेकॉंचा परीसर दणाणून गेला होता. डॉ. आयुष्य शर्मा, डॉ. प्रतिक सावंत आणि डॉ. नाझारेथ व इतर डॉक्टरांनी या मागण्या केल्या. डॉक्टर निदर्शनात उतरले असले तरी गोमेकॉच्या ओपीडी आणि इतर विभाग सुरूच होते. किमान आवश्यक डॉक्टर सेवेत आहेत आणि इतर सर्वजण निदर्शनात सहभागी झाले आहेत, असे गार्ड संघटनेने सांगितले.

'त्या' कॅमेरामनवर एफआयआर करा

आंदोलकांचे शिष्टमंडळ डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांना भेटले. आरोग्यमंत्र्यांनी या प्रकरणात डॉक्टरची जाहीर माफी मागावी ही मागणी केली. या शिवाय व्हीआयपी कल्चर बंद करावे, शनिवारच्या घटनेची निःपक्ष चौकशी करणे तसेच व्हिडिओग्राफी करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या पैकी माफी मागण्याचा विषय आरोग्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल, असे सांगितले आणि इतर मागण्या मान्य केल्या.

विरोधी पक्षांचा डॉक्टरांना पाठिंबा

आंदोलक डॉक्टरना समर्थन देण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आम आदमी पक्षाचे गोवा प्रमुख अॅड. अमित पालेकर, आरजीचे आमदार वीरेश बोरकर, काँग्रेसचे सांताक्रूझचे गटाध्यक्ष जॉन नाझारेथ तसेच अन्य कार्यकर्ते सकाळी गोमेकॉत दाखल झाले. यावेळी विरोधकांनी विश्वजीत राणे यांच्या कृतीचा निषेध करत डॉक्टरांना पाठींबा दिला.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी ज्या ठिकाणी येऊन माझा अपमान केला त्याच ठिकाणी त्यांनी कॅमेऱ्यासमोर येऊन माफी मागितली पाहिजे. २४ तासांत तसे झाले नाही तर पुढील कृती ठरविणार आहोत. ज्या 'बी-१२' इंजेक्शनवरून हे सर्व घडले ते इंजेक्श ते आपत्कालीन सेवेत येत नाही. - डॉ रुद्रेश कुट्टीकर, गोमेकॉ.

आमचा पक्ष डॉक्टरांसोबतच आहे. डॉक्टरना आम्ही देव मानतो. आरोग्यमंत्र्यांच्या कथित वर्तनानंतर डॉक्टरांनी जे आंदोलन सुरु केले आहे त्याबद्दल मी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच आरोग्यमंत्र्यांनीही झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. मुख्यमंत्री पुन्हा एकदा मंत्र्याशी बोलून या विषयावर तोडगा काढतील. - दामू नाईक, प्रदेशाध्यक्ष, भाजप. 

टॅग्स :goaगोवा