शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

खास दर्जासाठी शक्ती वाया नको!

By admin | Updated: November 5, 2015 02:13 IST

पणजी : गोव्याला खास दर्जा मिळाला तर आम्हालाही तो हवाच आहे; पण जी गोष्ट शक्य नाही त्या गोष्टीसाठी शक्ती वाया घालविण्यात अर्थ नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बुधवारी मांडली

पणजी : गोव्याला खास दर्जा मिळाला तर आम्हालाही तो हवाच आहे; पण जी गोष्ट शक्य नाही त्या गोष्टीसाठी शक्ती वाया घालविण्यात अर्थ नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बुधवारी मांडली. येत्या रविवारी आपल्या सरकारला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी येथे पत्रकार परिषद घेतली. पार्सेकर म्हणाले की, खास दर्जा मिळणे शक्य नसल्याने त्याविषयी शक्ती वाया घालविणे मला आवश्यक वाटत नाही. गोव्याला खास दर्जा मिळणे म्हणजे जे काही अपेक्षित आहे, त्या गोष्टी आम्ही खास दर्जा न मिळताही करून घेत आहोत. आम्ही गोव्यासाठी केंद्राकडे आर्थिक पॅकेज मागितले नाही; पण केंद्राने पॅकेज न देता हजारो कोटींचे प्रकल्प आम्हाला दिले. गेल्या वर्षभरात मार्गी लावलेल्या कामांविषयी बोलताना पार्सेकर म्हणाले की, आम्ही अनेक रस्ते, पूल, उड्डाण पूल यांची कामे हाती घेतली आहेत. तीन हजार कोटी रुपये खर्चाच्या जुवारी पुलासह अनेक रस्ते, त्यांचे रुंदीकरण व काही बायपास यांची कामे यापुढे होणार आहेत. रायबंदर बायपासचे काम या महिन्यात पूर्ण होईल. मिरामार-दोनापावल रस्त्याचे यापूर्वी रेंगाळलेले कामही नजीकच्या काळात पूर्ण होईल. कोकण रेल्वेचा डबल ट्रॅक टाकण्याचे कामही मार्गी लागेल. त्यानंतर मोपा विमानतळ ते काणकोण असे अंतर खूप कमी होईल. मुख्यमंत्री म्हणाले की, आरोग्य, कृषी, पर्यटन, खनिज, पोलीस, शिक्षण या क्षेत्रांतही सरकार चांगले काम करत आहे. ग्रामीण भागातही पर्यटनाची नवनवी दालने आम्ही खुली करू. दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या १ लाख ३० हजार लाभार्थींना प्रत्येकी दोन हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जात आहे. गृह आधार योजनेखाली १ लाख १८ हजार व्यक्तींना १ हजार २०० रुपयांचे अर्थसाहाय्य वितरित केले जाते. लाडली लक्ष्मी योजनेचा आतापर्यंत १४ हजार ५०० मुलींना लाभ मिळाला आहे. सरकारच्या गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने ५३ प्रकल्प मंजूर केले असून त्यापैकी ५० टक्के प्रकल्पांचे काम मार्गी लागत आहे. (खास प्रतिनिधी)