पणजी : मृत्यूनंतर अंत्यसंस्कारापूर्वी महिलेच्या मृतदेहावरील कपडे काढण्याची प्रथा थांबविण्याचा ऐतिहासिक आदेश मानवी हक्क आयोगाने सोमवारी दिला. शतकानुशतके चाललेली ही कुप्रथा आता खंडित होणार आहे. मात्र या आदेशाचे काटेकोर पालन करताना प्रशासनाची कसोटी लागणार आहे. ‘बायलांचो साद’ या महिलांसाठी काम करणाºया स्वयंसेवी संस्थेने या प्रकरणी मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली होती. त्यावर आयोगाने हे आदेश काढले. ‘बायलांचो साद’ने या आदेशांचे स्वागत केले असून, हे एक मोठे पाऊल असल्याचे अध्यक्ष सबिना मार्टिन्स यांनी सांगितले.
महिलांच्या मृतदेहावरील कपडे काढू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 05:34 IST