शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी पश्चिमेकडे डोळे नकोत: सहस्त्रबुद्धे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 20:48 IST

विकसित होण्यासाठी आपल्याला कोणत्याही राष्ट्राचा आदर्श घेण्याची गरज नाही, आपल्या देशाचा हजारो वर्षांच्या इतिहासाचे स्मरण केले तरी पुरेसे आहे, असे विज्ञान भारतीचे प्रमुख जयंत सहस्त्रबुद्धे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पणजी येथील हिंदू चेतना संगम कार्यक्रमात बोलताना सांगितले.

पणजी: विकसित होण्यासाठी आपल्याला कोणत्याही राष्ट्राचा आदर्श घेण्याची गरज नाही, आपल्या देशाचा हजारो वर्षांच्या इतिहासाचे स्मरण केले तरी पुरेसे आहे, असे विज्ञान भारतीचे प्रमुख जयंत सहस्त्रबुद्धे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पणजी येथील हिंदू चेतना संगम कार्यक्रमात बोलताना सांगितले.सह्त्रबुद्धे यांनी सांगितले की अवघ्या काही वर्षांचा काळ हा गुलामीत गेला याचा अर्थ हजारो वर्षांचा इतिहास असलेला आपला देश हा सदाकाळ गुलाम नव्हता. आपला देश हा खूप विकसित होता. अपल्या देशामधील नालंदा सारख्या विद्यापीठात शिक्षण घेण्याची संधी मिळावी यासाठी विदेशातून लोकांचा या देशात ओघ सुरू होता. अक्रमकांनी नंतर नालंदा विद्यापीठ नष्ट केले आणि तेथील समृद्ध वाचनालयही जाळून टाकले हा इतिहास जेव्हा आपल्याला ठाऊक आहे तेव्हा विकासासाठी पश्चिमेला डोळे लावून राहण्याची आपल्याला आवश्यकता नाही. हिंदुत्वाची आणि पर्यायाने भारतियत्वाची जाणीव ठेवली तरी पुरे असे त्यांनी सांगितले.संपूर्ण जगात भारत हा असा देश आहे की ज्या देशाने कधीच कुणावर आक्रमण नाही केले. मानवतावादाची मूल्ल्ये भारताने जपली आहेत. वसुधैव कुटुंबकम हा संदेशभारताने जगाला दिला आहे. विज्ञानाच्या क्षेत्रातही अनेक संशोधने भारतात झालेली आहेत. त्यामुळे आपण इत राष्ट्रांपेक्षा कमी प्रगत असल्याचा न्यूनगंड कधीही ठेवता कामा नये असे त्यांनी सांगितले. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम यांच्या शब्दात विकासाची संकल्पना सांगायचे झाल्यास आपल्याला नालंदाचे गतवैभव प्राप्त करावयाचे आहे असे ते म्हणाले.हेडगेवार विद्यालयाच्या मळा - पणजी येथील विद्यालयासमोरच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर विभाग कार्यवाह नाना बेहरे आणि प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विशाल सावंत उपस्थित होते. तसेच स्वयंसेवक आणि नागरिकही उपस्थित होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर हे कार्यक्रमाला पूर्ण गणवेशात उपस्थित होते.