शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दारुनं केला घात ! फिल्मी स्टाईलप्रमाणे मित्राचाच केला गेम, आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 13:00 IST

दारूच्या नशेत आपल्याच मित्राची अगदी फिल्मी स्टाईलमध्ये डोक्यात गोळी घालून हत्या केली. गोव्यातील ही घटना आहे.

मडगाव (गोवा) : दारूच्या नशेत आपल्याच मित्राची अगदी फिल्मी स्टाईलमध्ये डोक्यात गोळी घालून हत्या केल्यानंतर संशयित फय्याज उर्फ  छोटू केलेल्या पापाचं प्रायश्चित्त करण्यासाठी कर्नाटकातील मूळ गावी देवदर्शनाला जाऊन आला. देवदर्शन आटोपून गुरूवार (28 सप्टेंबर) सकाळी बेती-रामनगर (पर्वरी) येथील आपल्या सासुरवाडीस आला असता मडगाव पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. व्यवसायाने मॅकेनिक असलेल्या छोटुने दोन दिवसांपूर्वी म्हणजे मंगळवारी (26 सप्टेंबर) शांतीनगर रावणफोंड (मडगाव) येथे एका बारमध्ये दारू पित बसलेल्या अब्दुल कादर (४२) या मूळ कर्नाटकातील गवंड्याच्या डोक्यात देशी कट्टयाने गोळी झाडून त्याची हत्या केली.  यावेळी त्यानं अगदी फिल्मी स्टाईलमध्ये त्याने कादरच्या कनपटीला कट्टा लावून ‘क्या तुझे टपकांऊ क्या?’ असे म्हणत अगदी जवळून गोळी झाडली होती. त्यानंतर तो फरार झाला होता.

बुधवारी त्याची स्कूटर पोलिसांना सापडली होती. मात्र त्याचा पत्ता लागू शकला नव्हता. कदाचित बेती-रामनगर येथील आपल्या सासुरवाडीस तो येण्याची शक्यता असल्याने मडगांव पोलिसांनी तेथे सापळा रचून ठेवला होता. गुरूवारी सकाळी तो आला असता  पोलिसांच्या तावडीत तो सापडला. या प्रकरणात मडगांवचे पोलीस निरीक्षक सी.एल. पाटील हे तपास करत आहेत.

टॅग्स :Murderखून