शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सेवेत मुदत वाढ देऊ नका, गोवा सरकारी कर्मचारी संघटनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 19:22 IST

अनेक सरकारी कामगारांची बढती प्रलंबित असताना काही सरकारी अधिकारी व कामगारांना सेवेत मुदत वाढ दिली जात आहे.

नारायण गावस  

पणजी : अनेक सरकारी कामगारांची बढती प्रलंबित असताना काही सरकारी अधिकारी व कामगारांना सेवेत मुदत वाढ दिली जात आहे. याविरोधात आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. आता पुन्हा तोच प्रकार सुरु आहे. सरकारने ही मुदत वाढ रद्द करावी, अशी मागणी गोवा सरकारी कर्मचारी संघटनेने पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी या संघटनेचे अध्यक्ष अभय मांद्रेकर, सरचिटणीस समिर नागवेकर, माजी अध्यक्ष प्रशांत देवदास व इतर उपस्थित होते.सरकारी सेवेत अनेक कामगार आहेत पण काही अधिकारी हे अनेक वर्षे सेवा करुन निवृत्त होण्याच्या वेळी पुन्हा एक दोन वर्षांची मुदत वाढ दिली जाते. त्याच्या खालोखाल काम करणाऱ्या कामगारांना नंतर बढती मिळत नाही. हे चुकीचे आहे असे अनेक कामगार आहे जे निवृत्त होऊन पुन्हा सेवेत आहेत. आमचा याला पूर्ण विरोध आहे. आम्ही या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना पुन्हा निवदेन देणार आहोत. हा इतर प्रमाणिक कामगारांवर केला जाणारा अन्याय आहे, असे या संघटनाचे अध्यक्ष अभय मांद्रेकर यांनी सांगितले.

सर्व नावे समोर आणणारसरकारी सेवेत निवृत होऊनही काही कामगार पुन्हा मुदत वाढ घेउन काम करतात त्यांची नावे आम्ही लवकरच समोर आणणार आहेत. त्यांनी स्वताहून खरेतर निवृत्त होणे गरजेचे होते. आज अनेक लोक बढतीच्य प्रतिक्षेत आहेत. प्रामाणिक उमेदवारांना न्याय मिळत नाही तसेच कंत्राटी पदे भरली जात असल्याने खात्यात महत्वाची पदे भरता येत नाही. आम्ही सरकारी कर्मचारी संघटना समस्या सरकारकडे पोहचवित असतो. पण तरीही याची योग्य दखल घेतली जात नाही असे, अभय मांद्रेकर म्हणाले. ४०० पेक्षा जास्त जणांना मुदत वाढसरकारी सेवेत ४०० पेक्षा जास्त जण मुदत वाढ घेउन काम करत आहेत. यात मोठे अधिकारी पदापासून चालक तसेच मदतनीस आहेत. यामुळे अन्य बेरोजगार युवकांना नोकरी मिळत नाही. सेवेतून निवृत्त झाल्यावर मुदत वाढ नाही. हे बंद झाले नाहीतर या विरोधात आम्हाला पुन्हा निदर्शने करावी लागणार आहे. आहे, असे गोवा सरकारी कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष प्रशांत देविदास यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवा