शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
3
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
4
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
5
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
6
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
7
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
8
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
9
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
10
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
11
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
12
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
13
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
14
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
15
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
16
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
17
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
18
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
19
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
20
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...

गोमंतकीयांना गृहीत धरू नये

By admin | Updated: April 12, 2017 02:35 IST

पणजी : बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या लामाणी व अन्य बिगर गोमंतकीयांनी, गोमंतकीयांना गृहीत धरू नये. तसेच २ लाख लोकांना

पणजी : बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या लामाणी व अन्य बिगर गोमंतकीयांनी, गोमंतकीयांना गृहीत धरू नये. तसेच २ लाख लोकांना घेऊन आंदोलन करण्याची बंजारा समाजाने जी धमकी दिली आहे ती खपवून घेणार नाही. जे लमाणी बेकायदा गोव्यात व्यवसाय चालवतात तो बंद करण्याकडे लक्ष द्यावे अन्यथा १० लाख गोवेकर रस्त्यावर उतरतील, असा इशारा रेव्होल्युशनरी गोवन्स संस्थेतर्फे पत्रकार परिषदेतून देण्यात आला आहे. या वेळी या संस्थेचे सदस्य नाट्यकलाकार राजदीप नाईक, आरजे पंकज कुडतरकर, मनोज परब, निगम नाईक, सूरज नाईक, राज गोवेकर, माधवी परब आदी सदस्य उपस्थित होते. या संस्थेचा कोणा एका विशिष्ट समाजावर आरोप नाही; पण जे बेकायदारीत्या गोव्यात व्यवसाय करतात, पर्यटकांना त्रास देतात त्यांच्या विरोधात ही चळवळ उभी राहिली असल्याचे राजदीप नाईक यांनी सांगितले. फेसबुकच्या माध्यमातून ही संस्था स्थापन करण्यात आली असून फक्त सोशल मीडियावर न राहता प्रत्यक्ष आंदोलन करण्यासाठी एकत्र आल्याचे ते म्हणाले. पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी केलेल्या विधानाचे आपण समर्थन करत नसून त्यांनी आधी बिगर गोमंतकीयांची वोट बँक तयार केली आहे त्याकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. गोव्यात येऊन हुकूमशाहीची वृत्ती खपवून घेतली जाणार नाही. गोव्यात स्थायिक झाल्यानंतर गोमंतकीयांची आडनावे लावून नावात बदल करण्याबाबत देखील नियंत्रण आले पाहिजे, असे नाईक यांनी सांगितले. गोव्याचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ही चळवळ उभी राहिली असल्याचे मनोज परब म्हणाले. आपल्या गोव्यात नीज गोंयकार लोकच दुर्मिळ होऊन बसले आहेत. बिगर गोमंतकीय येथे येतात व बेकायदा व्यवसाय चालवतात. रस्त्याच्या बाजूला नर्सरी उभारून, सिमेंट ब्लॉक्स घालून व्यवसाय करतात तसेच समुद्रकिनारी मसाज, टॅटूचे बेकायदा व्यवसाय चालवतात. उलट हेच लोक गोमंतकीयांकडे दादागिरी करतात. ते आता खपवून घेणार नाही. गोंयकारपणाचा नारा घेऊन जे सरकार स्थापन झाले आहे त्यांची देखील जबाबदारी असून गोंयकारपण टिकविण्यासाठी या विषयांकडे आधी लक्ष देणे आवश्यक असल्याचे परब म्हणाले. या विषयावर गोवाभरातील तरुणांमध्ये जागृती केली जाईल व पुढचे पाऊल ठरविले जाणार, असे कुडतरकर यांनी सांगितले. नकारात्मक व समाजविरोधी घटक डोके वर काढत असून गोमंतकीयांनी सुशेगादपणा सोडून जागृत होणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. वोट बँकेच्या नावाने बिगर गोमंतकीयांचे पालनपोषण करणे राजकीय पक्षांनी थांबवावे, असेही ते म्हणाले. गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर रशियनांनी विविध व्यवसाय उभारले असून तेथे भारतीयांना बंदी असल्याचे फलक लावले आहेत. हे कृत्य निषेधार्ह असून या विषयावर देखील आवाज उठवणार, असे राज गोवेकर म्हणाले. गोव्यात स्थलांतरितांची संख्या वाढतच असून त्यावर नियंत्रण आले पाहिजे. यामुळे गोव्यातील महिला देखील सुरक्षित नसल्याचे माधवी परब म्हणाल्या. (प्रतिनिधी)