शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

झाडे पाडण्याचा आदेश स्थगीत, मोपा प्रकरणात गोवा सरकारला खंडपीठाचा दणका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2018 21:35 IST

मोपा विमानतळ प्रकल्पाच्या ठिकाणी २१७०३ झाडे मारण्यासाठी परवानगी देण्याच्या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने वनखात्याला दणका दिला आहे.

पणजी : मोपा विमानतळ प्रकल्पाच्या ठिकाणी २१७०३ झाडे मारण्यासाठी परवानगी देण्याच्या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने वनखात्याला दणका दिला आहे. या वादग्रस्त परवान्याच्या विरोधात फेडरेशन आॅफ रेनबो वॉरियर या बिगर सरकारी संस्थेने दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी घेऊन निवाडा देण्याचा आदेश खंडपीठाने प्रधान मुख्य वनपालला दिला आहे. 

मोपा येथे विमानतळ प्रकल्प परिसरात झाडांची कत्तल करण्याच्या बाबतीत लोकांनी जाब विचारल्यावर वनखाते जबाबदारी टाळू शकत नाही हे खंडपीठाच्या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. इतकी सारी झाडे मारण्यासाठी वनखात्याकडून परवानगी दिलीच कशी हा येथील लोकांचा प्रश्न होता. याचिकादार संघटनेने त्यासाठी अपिलेट अधिकारीणी असलेले गोव्याचे प्रधान मुख्य वनपाल अजय सक्सेना यांच्याकडे अर्ज केला होता. हा परवानगी तत्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणात सुनावण्या वगैरे घेऊन झाल्यानंतर सक्सेना यांनी हा विषय आपल्या अधिकार क्षेत्रात येत नसल्याचे सांगून निवाड देण्याचे टाळले होते. त्यामुळे त्याच्या विरोधात रेनबो संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात याचका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होवून गुरूवारी निवाडा देण्यात आला. वनखात्याकडून वृक्षतोडीसाठी देण्यात आलेली परवानगी ताबडतोब स्थगीत करण्यात यावी असा असे आदेशात म्हटले आहे. ही स्थगिती ४ आठवड्यांची असून तोपर्यंत प्रधान मुख्य वनपालांनी या प्रकरणावर सुनावणी घेऊन निर्णय द्यावा असेही आदेशात म्हटले आहे. या आदेशामुळे झाडे तोडण्याचे काम ताबडतोब थांबवावे लागणार आहे आणि सुनावणी घ्यावी लागणार आहे. रेनबो बिगर सरकारी संघटनेकडून खंडपीठात दाखल करण्यात आलेली ही जनहीत याचिका या वर्षीची पहिलीच जनहीत याचिका ठरली असून तीही याचिकादाराला दिलासा देणारा निवाडा देणारी ठरली आहे. खंडपीठाने याचिका निकालात काढली आहे. खंडपीठाच्या निवाड्याचे याचिकादार संघटना फेडरेशन आॅफ  रेनबो वॉरियरसकडून स्वागत करण्यात आले आहे. संघटनेकडून सरकारच्या या कृतीचा निषेध केला आहे. तसेच एक्सीस बँकेने या प्रकल्पाला आर्थिक सहाय्य दिल्याबद्दल बँकेचाही निषेध संघटनेने केला आहे. हा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीवर संघटना कायम आहे.

टॅग्स :Courtन्यायालयgoaगोवा