दिगंबर कामत आणि लोबो यांच्याविरुद्धची अपात्रता याचिका सभापतींनी फेटाळली
By किशोर कुबल | Published: May 9, 2024 03:57 PM2024-05-09T15:57:51+5:302024-05-09T15:58:38+5:30
Goa News: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी आमदार मायकल लोबो आणि दिगंबर कामत यांच्या विरोधात दाखल केलेली अपात्रता याचिका सभापती रमेश तवडकर यांनी फेटाळून लावली आहे.
- किशोर कुबल
पणजी - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी आमदार मायकल लोबो आणि दिगंबर कामत यांच्या विरोधात दाखल केलेली अपात्रता याचिका सभापती रमेश तवडकर यांनी फेटाळून लावली आहे.
जुलै २०२२ मध्ये पक्षांतर करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल या दोघांच्या अपात्रतेची मागणी करणारी याचिका पाटकर यांनी सभापती तवडकर यांच्याकडे सादर केली होती. जुलै २०२२ मध्ये फुटीसाठी आवश्यक दोन तृतीयांश संख्याबळ त्या गटाकडे झाले नाही. त्यामुळे फूट बारगळली परंतु नंतर सप्टेंबर २०२२ मध्ये वरील दोघांससह काँग्रेसचे आठ आमदार फुटले.
गेल्या १६ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने ८ आमदारांविरुद्धच्या अपात्रतेच्या याचिकेवर सभापतींनी जलद सुनावणी घ्यावी, असे निर्देश दिले होते. गिरीश चोडणकर यांच्या याचिकेवर न्यायालयाने हे निर्देश दिले होते. चोडणकर यांच्या अगोदरच्या प्रलंबित अपात्रतेच्या याचिकांच्या स्थितीबाबत माहिती द्यावी असे निर्देश देऊन सुप्रीम कोर्टाने तीन आठवड्यांनंतर प्रकरण निश्चित केले होते.